पुण्यात युवक काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते आज अचानक रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलांकडून हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला आहे. युवक काँग्रेसने राज्य सरकारच्या विरोधात हा हल्लाबोल मोर्चा काढला आहे. या मोर्चातून ‘नोकरी दो, नशा नहीं’ अशी घोषणाबाजी केली जात आहे.
“गेल्या 10 वर्षात सर्वाधिक बेरोजगारी वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्योगपती अदानी यांच्याकडचं लक्ष बाजूला सारुन देशातील तरुणांकडे बघत नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन करु. देशातील तरुणांना रोजगार मिळत नाही. ड्रग्जच्या विरोधात कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करणार. तो आमचा अधिकार आहे. यासाठी आम्हाला कुणाच्या परवानगीची गरज नाही”, अशी प्रतिक्रिया युवक काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने दिली.
पोलिसांचा मोठा बंदोबस्त
काँग्रेस भवनपासून पुणे डेक्कनच्या दिशेला हा मोर्चा निघाला आहे. या दरम्यान पोलिसांनी आंदोलकांना रोखत त्यांना ताब्यात घेतलं. यावेळी आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. आंदोलकांकडून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली जात आहे. या आंदोलनात शेकडो तरुण सहभागी झाले आहेत. आंदोलकांची मोठी गर्दी बघायला मिळत आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनावरील दबाव वाढला आहे. एवढी गर्दी जमल्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेत पोलिसांचा मोठा बंदोबस्त परिसरात तैनात आहे.
सर्वात मोठी बातमी! धनंजय मुंडे राजीनामा देणार? अजित पवार यांच्या सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
आंदोलकांची गर्दी पाहता वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी तातडीने संबंधित परिसरात रस्त्यावर बॅरिकेट्स लावले. त्यानंतर आंदोलकांची धरपकड करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलक पुणे डेक्कनच्या दिशेला जात असताना बालगंधर्व चौकात पोलिसांनी आंदोलकांना अडवलं. यावेळी आंदोलक पोलिसांचं न ऐकता पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते. पण पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली.

