Rajesaheb Deshmukh on Dhananjay Munde and Walmik Karad : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यावर अनेक गंभीर आरोप झाले आहेत. आमदार सुरेश धस सतत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.
राजेसाहेब देशमुख यांनी मोठा दावा केलाय ते म्हणाले की, धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यामुळेच माधव जाधव यांना मारहाण झाली. यासोबतच ते म्हणाले, धनंजय मुंडे हे बोगस मतदानावरच आमदार झाले आहेत. राजेसाहेब देशमुख म्हणाले की, मारहाण झाल्यानंतर लगेचच माधव जाधव यांनी ऑनलाईन तक्रार केली होती. मात्र, त्यानंतर पोलिसांनी जबाब घेतला नाही किंवा साधा उल्लेखही केला नाही.
प्रकाश आंबेडकरांची सुरेश धसांवर सडकून टीका, म्हणाले, धसांची डुप्लिकेट भूमिका बाहेरआम्ही सांगितले की, दीड हजार मयत मते झाली. आम्ही फक्त कागदे देतो पण त्याचे काहीच उत्तर येत नाही. एकअधिकार शाहीमुळे इतके दिवस गुन्हा दाखल करायला लागल्याचे राजेसाहेब देशमुखांनी म्हटले. ते पुढे म्हणाले, धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांनी परळीमध्ये एकअधिकार शाही केली. धनंजय मुंडेंच्या बंगल्यावरून वाल्मिक आण्णाचा फोन जायचा. 307 लावा 302 लावा. वाल्मिक आण्णाने म्हटल्यावर एफआयआर फाडायच्या.
त्यांच्या मर्जीतील पीएसआय त्यांच्या मर्जीतीलच सर्व लोक होते ना…त्यांनी त्यांच्या मर्जीतीलच लोक आणले, असेही राजेसाहेब देशमुख यांनी म्हटले आहे. यासोबतच त्यांनी म्हटले की, धनंजय मुंडे यांच्याच जीवावर कैलास फड हा हातात बंदुक घेऊन गोळ्या झाडतो. दुसरीकडे सुरेश धस यांनी महादेव मुंडे प्रकरणात थेट आता आरोप केले आहेत. ज्यानंतर मोठी खळबळ निर्माण झालीये. संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात दुटप्पी भूमिका घेत असल्याने सुरेश धस यांच्यावरही टीका केली जात आहे.

