• Wed. Jul 8th, 2026

    आजपर्यंत पार पडलेली अ. भा. मराठी साहित्य संमेलने… – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Feb 12, 2025

    साहित्य संमेलनामुळे समाज अधिक सुसंस्कृत, विचारी व विज्ञाननिष्ठ, विवेकवाद आणि मानवतावाद या त्रिसूत्रीने आधुनिक होण्यास मदत होते…नवी दिल्ली येथे पार पडत असलेल्या ९८ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा माहिती कार्यालय धुळे संकलित साहित्य संमेलने पार पडलेल्या ठिकाणांविषयी माहिती देणारा लेख… 

     माझा मराठीची बोलू कौतुके।

    परि अमृतातेहि पैजासी जिंके।

    ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन ।।

    असे संत ज्ञानेश्वर माऊली यांनी लिहून ठेवले आहे.

    अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला शेकडो वर्षाची परंपरा आहे. त्यामुळेच यंदाचे देशाची राजधानी दिल्लीत होत असलेले 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरणार आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर होणारे हे पहिले साहित्य संमेलन असणार आहे हे ही विशेष. पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सन 1878 मध्ये पुण्यात झाले होते, ज्याचे अध्यक्ष न्या. महादेव गोविंद रानडे हे होते. तर 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे झाले असून या संमेलनाचे अध्यक्ष रवींद्र शोभणे होते.

    आतापर्यंत झालेल्या 97 मराठी साहित्य संमलेनापैकी सर्वाधिक 14 संमलने आयोजित करण्याचा मान पुणे जिल्ह्यास मिळाला आहे. तर उत्तर महाराष्ट्रात आतापर्यंत 10 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने झाली आहेत. यात सन 1936 साली 22 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जळगाव येथे संपन्न झाले. त्यानंतर 1939 साली अहमदनगर, 1942 नाशिक तर 29 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन धुळे जिल्ह्यात 1944 साली झाले असून या संमलेनाचे अध्यक्ष भार्गवराम विठ्ठल वरेरकर हे होते. त्यानंतर 1952 अमळनेर (जि. जळगाव), 1984 जळगाव, 1997 अहमदनगर, 2005 आणि 2021 नशिक तर 2024 मध्ये अमळनेर (जि. जळगाव) येथे झाले.

    अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातून मराठी भाषा, साहित्य आणि विचारांबाबत मौलिक अशी मेजवाणी साहित्यरसिकांना मिळते. मराठी साहित्य जगतास दिशा दाखवणारे व विचार देणारे अध्यक्षीय भाषण हे या संमेलनाचे प्रमुख वैशिष्ट्य राहिले आहे. संमेलनातील विविध नावीण्यपूर्ण कार्यक्रमांद्वारे मानवी जीवनमूल्यांचे व विचारांचे पोषण घडते. पुस्तकांचे अफाट विश्व ग्रंथप्रदर्शन व पुस्तकांच्या लावलेल्या स्टॉलमधून उलगडत जाते. साहित्य हे जगण्यासाठी महत्वाचे सांस्कृतिक मूल्य आहे यांची जाणीव अशा संमेलनातून होते. समाज अधिक सुसंस्कृत, विचारी व विज्ञाननिष्ठ, विवेकवाद आणि मानवतावाद या त्रिसूत्रीने आधुनिक होण्यास या साहित्य संमेलनामुळे मदत मिळते. 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत झालेल्या संमलेनाचे ठिकाण व त्यांचे अध्यक्ष यांचा आढावा या लेखात घेण्यात आला आहे.

    आतापर्यंत झालेल्या साहित्य संमेलनाची माहिती..

    संमेलनवर्षेठिकाणअध्यक्ष
    11878पुणेन्या. महादेव गोविंद रानडे
    21885पुणेकृष्णशास्त्री राजवाडे
    31905सातारारघुनाथ पांडूरंग करंदीकर
    41906पुणेवासुदेव गोविंद कानिटकर
    51907पुणेविष्णू मोरेश्वर महाजनी
    61908पुणेचिंतापण विनायक वैद्य
    71909बडोदेकान्होबा रामछोडदास किर्तीकर
    81912अकोलाहरी नारायण आपटे
    91915मुंबईगंगाधर पटवर्धन
    101917इंदूरगणेश जनार्दन आगाशे
    111921बडोदेनरसिंह चिंतामण केळकर
    121926मुंबईमाधव विनायक किबे
    131927पुणेश्रीपाद कृष्ण कोल्हटकर
    141928ग्वाल्हेरमाधव श्रीहरी अणे
    151929बेळगावशिवराम महादेव परांजपे
    161930मडगाववामन मल्हार जोशी
    171931हैद्राबादश्रीधर व्यंकटेश केतकर
    181932कोल्हापूरसयाजीराव गायकवाड
    191933नागपूरकृष्णाजी प्रभाकर खांडिलकर
    201934बडोदेनारायण गोविंद चापेकर
    211935इंदूरभवानराव श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी
    221936जळगावमाधव जुलियन
    231938मुंबईविनायक दामोदर सावरकर
    241939अहमदनगरदत्तो वामन पोतदार
    251940रत्नागिरीनारायण सिताराम फडके
    261941सोलापूरविष्णू सखाराम खांडेकर
    271942नाशिकप्रल्हाद केशव अत्रे
    281943सांगलीश्रीपाद महादेव माटे
    291944धुळेभार्गवराव विठ्ठल वरेरकर
    301946बेळगावगजानन त्र्यंबक माडखोलकर
    311947हैद्राबादनरहर रघुनाथ फाटक
    321949पुणेशंकर दत्तात्रय जावडेकर
    331950मुंबईयशवंत दिनकर पेंढारकर
    341951कारवारअनंत काकबा प्रियोळकर
    351952अमळनेरकृष्णाजी पांडूरंग कुलकर्णी
    361953अमदाबादविठ्ठल दत्तात्रय घाटे
    371954दिल्लीलक्ष्मणशास्त्री बाळजी जोशी
    381955पंढरपूरशंकर दामोदर पेंडसे
    391957औरंगाबादअनंत काणेकर
    401958मालवणअनिल
    411959मिरजश्रीकृष्ण केशव क्षीरसागर
    421960ठाणेरामचंद्र श्रीपाद जोग
    431961ग्वाल्हेरकुसुमावती देशपांडे
    441962सातारानरहर विष्णु गाडगीळ
    451964मडगाववि. वा. शिरवाडकर
    461965सातारावामन लक्ष्मण कुलकर्णी
    471967भोपाळविष्णु भिकाजी कोलते
    481969वर्धापु. शि. रेंगे
    491973यवतमाळगजानन दिगंबर माडगुळकर
    501974इचलकरंजीपु. ल. देशपांडे
    511975कराडदुर्गा भागवत
    521977पुणेपु. भा. भावे
    531979चंद्रपूरवामन कृष्ण चोरघडे
    541980बार्शीगं. बा. सरदार
    551981 (फेब्रुवारी)अकोलागो. नी. दांडेकर
    561981 (डिसेंबर)रायपूरगंगाधर गाडगीळ
    571983अंबेजोगाईव्यंकटेश दिगंबर माडगुळकर
    581984जळगावशंकर रामचंद्र खरात
    591985नांदेडशंकर बाबाजी पाटील
    601988मुंबईविश्राम बेडेकर
    611988ठाणेवसंत कानेटकर
    621989अमरावतीकेशव जगन्नाथ पुरोहित
    631990 (जानेवारी)पुणेयु. म. पठाण
    641990 (डिसेंबर)रत्नागिरीमधु मंगेश कर्णिक
    651992कोल्हापूररमेश मंत्री
    661993साताराविद्याधर गोखले
    671994पणजीराम शेवाळकर
    681995परभणीनारायण सुर्वे
    691996आळंदीशांता शेळके
    701997अहमदनगरना. स. इनामदार
    711998परळी वैजनाथद. मा. मिरासदार
    721999मुंबईवसंत बापट
    732000बेळगावय. दि. फडके
    742001इंदूरविजया राजाध्यक्ष
    752002पुणेराजेंद्र बनहट्टी
    762003कराडसुभाष भेंडे
    772004औरंगाबादरा. ग. जाधव
    782005नाशिककेशव मेश्राम
    792006सोलापूरमारुती चित्तमपल्ली
    802007नागपूरअरुण साधू
    812008सांगलीम. द. हातकणंगलेकर
    822009महाबळेश्वरआनंद यादव
    832010पुणेद. भि. कुलकर्णी
    842010 (डिसेंबर)ठाणेउत्तम कांबळे
    852012चंद्रपूरवसंत आबाजी डहाके
    862013चिपळूणनागनाथ कोत्तापल्ले
    872014सासवडफ. मुं. शिंदे
    882015घुमान (पंजाब)संदानंद मोरे
    892016पिंपरी चिंचवडश्रीपाल सबनीस
    902017डोंबिवलीअक्षयकुमार काळे
    912018बडोदेलक्ष्मीकांत देशमुख
    922019यवतमाळअरुणा ढेरे
    932020उस्मानाबादफादर फ्रान्सिस
    942021नाशिकजयंत नारळीकर
    952022उदगीरभारत सासणे
    962023वर्धान्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर
    972024अमळनेररविंद्र शोभणे

    (संदर्भ-लोकराज्य)

    ०००

    • संकलन – जिल्हा माहिती कार्यालय, धुळे

     

     

     

     

     

    The post आजपर्यंत पार पडलेली अ. भा. मराठी साहित्य संमेलने… first appeared on महासंवाद.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed