Mumbai News: कमिशनच्या बदल्यात या टोळीने दीडशेपेक्षा अधिक बँक खाती पुरविल्याचे उघड झाले असून त्यातून हाती आलेल्या कोट्यवधी रुपयांमधून आरोपींनी आलिशान गाड्या आणि घरे खरेदी केल्याचे तपासातून समोर आले आहे.
हायलाइट्स:
- कमिशन घेऊन १५० बँक खात्यांची विक्री
- कोट्यवधींच्या कमाईवर ठिकठिकाणी मालमत्ता
- नेपाळ, कंबोडियातील ‘आकां ‘साठी काम
अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी काहींनी स्वतःची बँक खाती दिली होती, तर काहींनी पैसे देऊन इतरांची बँक खाती खरेदी केली होती. या टोळीने जवळपास दीडशे खाती सायबर चोरांना पुरवत त्यांच्याकडून कोट्यवधींचे कमिशन मिळवले. पोलिसांनी आरोपींकडून पाच लॅपटॉप, १६ मोबाइल, दोन कार, इतर साहित्य हस्तगत केले आहे. जप्त करण्यात आलेल्या कारमध्ये जग्वार आणि महिंद्रा मझारो यांसारख्या महागड्या गाड्यांचा समावेश आहे.

