Sanjay Raut News : महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाचे अंधश्रद्धावाल्यांचा बाजार असल्याचे संजय राऊतांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वर्षा बंगल्यावर राहत नाहीत हे न पटणारे आहे असे ते म्हणाले. यावेळी बोलताना, फडणवीसांची मुलगी आमचीच असून ती बोर्डात पहिली येणार असल्याचं राऊत म्हणाले.
माझ्याकडे जी माहिती आहे, जी बाहेर चर्चा आहे. जर जादूटोणा काही करायचं असेल तर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या ४० आमदारांवर करा, जे कामाख्य देवीला जाऊन रेडे कापून आले आणि सत्तेत बसले. जर असं असेल तर प्रधानमंत्र्यांपासून सगळ्यांवर अशा कारवाई कराव्या लागतील. काही विषय श्रद्धेचे असतात आणि काही विषय अंधश्रद्धेचे असतात. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्यांच्या मुलीची दहावीची परीक्षा आहे ती बोर्डात पहिली येवो, आमच्याच मुलीसारखीच आहे, असंही राऊत म्हणाले.
सागर बंगला आणि वर्षा बंगलामध्ये पाच पाऊलांचं अंतर आहे. सागर बंगला रामटेक आणि वर्षा बंगला लखनऊला आहे असं नाही ना, ठिक आहे. त्यांनी काही योजना ठरवली असेल पण तात्काळ मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर राहायला जायला पाहिजे. लोकांच्या दृष्टीने ते सोयीचं होतं. मंत्रालयामध्ये सगळ्यांना जाता येत नाही. मुळात एकनाथ शिंदे यांचं सरकार हे अंधश्रद्धेतून आलं होतं. आता देवेंद्र फडणवीस हे ईव्हीएम घोटाळ्यातून मुख्यमंत्री झाले हे त्यांनी मान्य केले पाहिजे. मी काय सांगतोय हे समजून घ्यायला शहाणा माणूस पाहिजे. कारण यांच्या डोक्यामध्ये गुंगी भरल्याचं म्हणत राऊतांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला.
निवडणूक आयोग निष्पक्ष असेस तर त्यांनी सर्व चॅनेल्सला नोटीस पाठवली पाहिजे. मोदींची डुबकी दाखवली गेली नाही पाहिजे. आज कोणताही चांगला मुहूर्त नाही मोदींनी, द्या किंवा निकालानंतर जाता आलं असतं पण त्यांनी त्यांनी दिल्लीच्या निवडणुकीचा दिवस निवडल्याचं म्हणत संजय राऊतांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला.

