Produced byविश्रांती शिंदे | Contributed byसंजय आहेर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम2 Feb 2025, 9:35 pm
मुद्दा मराठा आरक्षणाचा… गेल्या दोन वर्षांपासून आरक्षणासाठीची मागणी करणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या जालना जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आलीयं. २५ वर्षीय उच्चशिक्षित तरुणी राणी नाईकवाडे हिने आपलं जीवन संपवलंय. आणि कारण परीक्षेत उत्तीर्ण असूनही नोकरी मिळेना… मराठा आरक्षण नसल्या कारणाने तरुणीने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं नाईकवाडे कुटुंबियांनी सांगितलं.