• Sat. Mar 14th, 2026
    मुंबई-गोवा महामार्गाला अपघाताचे ग्रहण! पुन्हा एक दुर्घटना, ट्रेलर दुभाजकाला धडकला अन् अनर्थ घडला

    Mumbai-Goa Highway Road Accident : मुंबई-गोवा महामार्गावर सध्या अपघातांची मालिका संपता संपत नसल्याचे चित्र आहे. महामार्गावरील अपघातग्रस्त खिंड अशी ओळख असलेल्या सुकेळी खिंडीच्या उतारावर खैरवाडी गावाजवळ शनिवारी दुपारी कोलाड बाजुकडून पनवेलकडे जाणाऱ्या ट्रेलरचा भीषण अपघात झाला आहे.

    Lipi

    अमुलकुमार जैन, रायगड : मुंबई-गोवा महामार्गावर सध्या अपघातांची मालिका संपता संपत नसल्याचे चित्र आहे. महामार्गावरील अपघातग्रस्त खिंड अशी ओळख असलेल्या सुकेळी खिंडीच्या उतारावर खैरवाडी गावाजवळ शनिवारी दुपारी कोलाड बाजुकडून पनवेलकडे जाणाऱ्या ट्रेलरचा भीषण अपघात झाला आहे. चालकाचे आपल्या गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे ट्रेलरच्या अपघाताची ही दुर्दैवी घटना घडली. या अपघातात चालक जागीच ठार झाला आहे.

    घडले असे की, कोलाड बाजुकडून पनवेलकडे कंटेनर घेऊन जाणारा ट्रेलर क्रं एम. एच. ४३ बी. ९५६५ सुकेळी खिंडीच्या नियंत्रण तारावर आला असता ट्रेलर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ट्रेलर सरळ जाऊन रस्त्याच्या मध्येच असलेल्या दुभाजकावर जाऊन धडकला. त्यामुळे ट्रेलरवर असलेला कंटेनर १० ते १५ फुट अंतरावर उडून पलटी झाला आणि नंतर ट्रेलरही पुर्णपणे पलटी झाला. हा अपघात इतका भीषण होता की ट्रेलर चालक जागीच ठार झाला आहे. तर रात्री उशीरापर्यंत ट्रेलर चालकाची ओळख पटलेली नाही. सुदैवाने अपघात झाला त्यावेळी तेथुन दुसरे कोणतेही वाहन जात नव्हते. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे.
    इतिहासातील विनाशकारी आगीवर ३ आठवड्यानंतर नियंत्रण, मोठी जीवितहानी, हजारो घरे भस्मसात
    दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच वाकण टॅबच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि ट्रेलर पलटी होऊन रस्त्यावर पडलेल्या ऑईल व डिझेलवर जेसीबीच्या सहाय्याने माती टाकून वाहतूक एका बाजूने सुरळीतपणे सुरू ठेवली. तर सुकेळी खिंडीच्या उतारावर त्याचठिकाणी मागील एका महिन्यात ३ ते ४ अपघात घडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या अपघातातग्रस्त ठिकाणी लवकरात लवकर गतिरोधक बसविण्याची मागणी जोर धरु लागली आहे. जर का लवकरात लवकर गतिरोधक बसविण्याचे काम पुर्ण केले नाही तर आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात स्थानिक लोकप्रतिनिधींकडून देण्यात आला आहे.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed