Nagpur Girl Student Suicide : या ऑनलाइन गेममध्ये ५० दिवसांचे चॅलेंज देण्यात येते. ५० दिवसांत चॅलेंज पूर्ण न झाल्यास खेळणाऱ्याला आत्महत्या करावी लागते. सध्या या गेमला भारतात बंदी आहे.
काय आहे प्रकरण?
विद्यार्थिनीने डिसेंबर महिन्यात रशियाहून विशिष्ट बनावटीचा चाकू ऑनलाइन मागवला होता. ६ डिसेंबरला तो तिला मिळाला. बहुदा याच दिवसापासून तिने ‘गेम’ला सुरुवात केली. २७ जानेवारीच्या पहाटे तिने याच चाकूने आधी आपल्या हाताची नस कापली व नंतर गळा चिरुन स्वतःला संपवले. रविवारी मध्यरात्री आणि सोमवारी पहाटे तिच्या गेमला ५० दिवस पूर्ण झाले. टास्क पूर्ण करू न शकल्याने तिने आत्महत्या केली, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
काही महिन्यांपूर्वी मुंबईतही एका बड्या अधिकाऱ्याच्या मुलाने इमारतीवरुन उडी घेऊन जीवन संपवले होते. तोही याच चॅलेंजचा बळी असल्याची चर्चा त्यावेळी होती.
Mumbai Crime : बायको-पोराने जीव दिला, शिवशंकर पोलिसांसमोर रडला, पण एका गोष्टीने गेम वाजला, मुंबईतील घटनेचं गूढ उकललं
मोबाईलमध्येच गुंतलेली
मोठ्या पदावर कार्यरत असताना संबंधित विद्यार्थिनीच्या आईचा अपघात झाला. अपघातानंतर तिच्या आईने स्वेच्छानिवृत्ती घेतली. यावेळी विद्यार्थिनी ही मुंबईत राहायची. गतवर्षी जून महिन्यात तिच्या वडिलांची नागपुरातील रिझर्व्ह बँकेत बदली झाली. त्यामुळे ती कुटुंबासह नागपुरात आली. तिने एका नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.
Nagpur Crime : नागपूरच्या विद्यार्थिनीने रशियाहून ‘ते’ मागवलं, ६ डिसेंबरला गेम सुरु, पाच पानी चिठ्ठी लिहून आयुष्य संपवलं
महाविद्यालयात तिची कोणाशीही मैत्री झाली नाही. त्यामुळे ती मोबाइलवरच वेळ घालवायची. इंटरनेटवर ती युरोपियन संस्कृतीबाबत सतत माहिती घेत होती, असे तपासात आढळून आले. तिने आत्महत्येपूर्वी पाच पानी ‘सुसाइड नोट’ लिहिली. यातील दोन पाने जर्मन भाषेत आहेत. तिने काय लिहिले याची माहिती तज्ज्ञांकडून पोलिस घेत आहेत.
Beed News : आडनाव नाही, पहिल्या नावाने हाक मारा; बीड पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांचे आदेश, कारण स्तुत्य
अन् पोलिसांचाही थरकाप उडाला !
धंतोली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील छत्रपतीनगर परिसरात राहणाऱ्या विद्यार्थिनीने टाइल्सवर बसून चाकूने हात व शरीरावर पाच चिरे मारले. त्यानंतर चाकूने गळा चिरून तिने स्वतःला संपविले. तिच्या शरीरातील रक्त संपूर्ण घरात पसरले. पोलिस घटनास्थळी पोहोचले त्यावेळी ती रक्ताच्या थारोळ्यात होती. तिला बघताच पोलिसांचाही थरकाप उडाला. एखाद्या निघृण हत्येच्या घटनेतही पोलिसांनी असे दृश्य बघितले नसावे.