चित्त्याच्या चपळाईने धाव, डोंबिवलीत बाळाचा कॅच
डोंबिवली पश्चिम भागातील देवीचा पाडा परिसरात असलेल्या अनुराज् हाइट्स टॉवरच्या तिसऱ्या मजल्यावरुन एक चिमुरडा खाली पडला, मात्र इमारतीत ग्राहकांना घर दाखवण्यासाठी गेलेल्या तरुणाने प्रसंगावधान राखत त्याला झेललं आणि त्याचे प्राण वाचवले. क्रिकेट खेळण्याची सवय असल्यामुळे कॅच पकडावा, तसा बाळाला धरण्याचा प्रयत्न केला, अशी प्रतिक्रिया देसले कुटुंबासाठी देवदूत ठरलेल्या ३५ वर्षीय भावेश म्हात्रेने दिली आहे.