Gender Identification Test: राज्यात अलीकडे मुलांच्या प्रमाणात मुलींची संख्या कमी होत आहे. दर हजार मुलामागे मुलींची संख्या साडेआठशे ते नऊशे दरम्यान असल्याचे काही जिल्ह्यातील आकडेवारीवरून दिसत आहे.
हायलाइट्स:
- गर्भलिंग निदान चाचणी रोखण्यासाठी सरकारचे प्रयत्न
- स्टिंग ऑपरेशनला मदत करणाऱ्यांना लाखाचे बक्षीस
अमित शहांनी भुजबळांना दिली शिंदेंची खुर्ची, सहकार परिषदेतील गुफ्तगूमुळे चर्चांना उधाण, कानात काय सांगितलं?
ही गर्भलिंग चाचणी रोखण्यासाठी अनेक ठिकाणी छापे टाकले जातात. स्टिंग ऑपरेशन केले जात आहेत. पण, यामध्ये मदत करणाऱ्या गर्भवती महिला, कार्यकर्ते व संघटनांना सन्मानाऐवजी आरोपीप्रमाणे वागणूक मिळत असल्याच्या तक्रारी आहेत. हजार रुपयाचे तुटपुंजे बक्षीस मिळत असल्याने आणि काही वेळा तेही मिळत नसल्याने या मोहिमेत सहभागी होण्यास फारसे कुणी पुढे येत नाहीत.
PMP बसचा आरसा तोडला, चालकाने बाईकवरुन पाठलाग करत अडवलं, पण शेवट भीषण झाला
याबाबतच्या अनेक तक्रारी नूतन आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यापर्यंत पोहोचल्या. त्यांनी तातडीने राज्यातील आरोग्य अधिकारी व पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. गर्भलिंग चाचणी विरोधाच्या मोहिमेत सहभागी होणाऱ्यांना त्रास दिला, तर कारवाई करण्याचा इशाराच त्यांनी दिला. दरम्यान, ही मोहीम अधिक व्यापक व्हावी यासाठी मोठे बक्षीस देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. यामुळे या मोहिमेला अधिक गती येण्याची चिन्हे आहेत.
गर्भलिंग चाचणी रोखण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. बक्षिसाची रक्कम वाढविण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येणार आहेच, शिवाय इतर अनेक उपायही राबविण्यात येतील. –प्रकाश आबिटकर, आरोग्यमंत्री
जीव धोक्यात घालून आम्ही या मोहिमेत सहभागी होतो. पण, येथे सरकारकडून ना सन्मानाची वागणूक मिळते, ना संरक्षण. त्यामळे यापुढे तरी कृती दल सुरू करताना मोहिमेत सहभागी होणाऱ्यांना काही सुविधा द्याव्यात. –गीता हसूरकर, सामाजिक कार्यकर्ता