Mumbai News: प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील काही औषधांमध्ये ‘स्टार्च’ , टाल्कम पावडर हा घटक होता. तो तुलनेने कमी हानीकारक असला तरीही त्याचे औषधांमधील प्रमाण किती होते तसेच या औषधांमध्ये कोणत्या हानिकारक घटकांचा समावेश होता याचे पृथक्करण होणेही गरजेचे आहे, याकडे लक्ष वेधले.
हायलाइट्स:
- भेसळयुक्त औषधांमध्ये डायक्लोफिनॅक, मिडिआझोलम, कॅल्शियमचा समावेश
- औषधे किती रुग्णांनी घेतली, याची नोंद नाही
- हानिकारक घटकांचे पृथक्करण होणेही गरजेचे
मिळालेल्या माहितीनुसार, यातील अनेक गोळ्या या साध्या तापासाठी देण्यात येणारे औषध नसून प्रतिजैविकांचाही त्यात समावेश होता. आजाराची तीव्रता कमी न झाल्यास प्रतिजैविके देण्यात येतात. ही औषधे या कालावधीमध्ये किती रुग्णांनी घेतली, त्याचा त्यांच्या आरोग्यावर कसा परिणाम झाला ही माहिती सार्वजनिक रुग्णालयांकडे अद्याप उपलब्ध नाही.
ती नोंदही गरजेची
सार्वजनिक आरोग्यविभागामध्ये यावर्षी ज्या औषधांची उपलब्धता करण्यात येणार आहे, त्याची गुणवत्ता चाचणी झाली आहे का, त्याची नोंद आरोग्य विभागाने ठेवणेही गरजेचे आहे. रुग्णालायमध्ये जी औषधे सर्वाधिक संख्येने दिली जातात, त्याचा रुग्णांवर कोणता परिणाम होतो, तो कोणत्या घटकांमुळे होतो याची माहिती असणे गरजेचे आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाइतकीच ही जबाबदारी आरोग्य विभागाचीही आहे, याकडेही तज्ज्ञांनी लक्ष वेधले.
लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज! ‘या’ तारखेपर्यंत खात्यात पैसे होणार जमा, १५०० की २१००? जाणून घ्या
औषधांमधील भेसळ प्रकरणातील अहवाल काही दिवसांमध्ये उपलब्ध होणार आहे. त्यामध्ये या बाबींचा गांभीर्याने विचार करण्यात येईल. आता ३० नव्या मोबाइल व्हॅनची उपलब्धता करण्यात आली आहे. त्यांची मदत घेऊन ही प्रक्रिया अधिक जलदगतीने करण्याचा प्रयत्न असेल – नरहरी झिरवाळ, अन्न व औषध

