मराठा आरक्षणासाठी मनोज जारंग पाटील २५ जानेवारीपासून पुन्हा उपोषणाला बसणार आहेत.मनोज जरांगे हे आपल्या आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम असल्याचं त्यांनी सांगितलं.आमच्या मागण्यांची सरकारनं अंमलबजावणी केली तर उपोषण स्थगित करू असं जरांगे म्हणाले. हा लढा आता मराठ्यांचा आहे सरकार मराठ्याच्या बाजूने आहे का नाही हे दिसून येईल असं जरांगे म्हणाले.सरकार दगाफटका करणार नाही, माझा देवेंद्र फडणवीसांवर विश्वास आहे असंही जरांगे म्हणाले.