Eknath Shinde Speech : स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज बीकेसी येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मेळावा पार पडला आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतदिनी आपण विजयोत्सव साजरा करत आहोत, असे प्रतिपादन यावेळी एकनाथ शिंदेंनी केले आणि उद्धव ठाकरेंवर देखील तोफ डागली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, निवडणुकीत आपण ऐतिहासिक विजय मिळवला आहे. आपण आज विजयोत्सव साजरा करत आहोत. पुढच्या अनेक पिढ्या या विजयाची आठवण ठेवल्याशिवाय राहणार नाही. हे यश बाळासाहेबांच्या विचाराचं आणि महायुतीच्या एकजुटीचं आहे. लाडक्या बहिणींचं, लाडक्या भावांचं लाडक्या शेतकऱ्यांचं लाडक्या तरुणांचं हे यश आहे. गरीब शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री होऊ शकला, याची मला जाणीव आहे. तर मुख्यमंत्र्यांनी माझ्या आगोदर कोणीतरी भाषण करेल असं वाटलं होतं. पण एकट्याला बॅटिंग करायला ठेवलं. असेही मिश्कील विधान उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.
सत्तेच्या खुर्चीला लाथ मारून…; शिवसेना मेळाव्यात एकनाथ शिंदेंचे सूचक वक्तव्य, काय म्हणाले?
आताचा हा ऐतिहासिक विजय आहे आता जबाबदारी वाढलेली आहे. आता दुप्पट वेगाने नाहीतर चौपट काम करावे लागेल. शिवसेनेचा विचारांबरोबर तडजोड होणार नाही, असेही उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
दोन्ही शिवसेनांचे मेळावे जोरात, पण ‘ते’ दोघे दिसेनात; ठाकरे, शिंदेंच्या सभांना कोणाची दांडी?
शिंदे पुढे ठाकरे गटावर तोफ डागत म्हणाले की, बाळासाहेबांनी आम्हाला स्वाभिमान शिकवला आहे. बाळासाहेबांच्या विचारांशी आता प्रतारणा होणार नाही. तत्वासाठी सत्तेच्या खुर्चीला लाथ मारून आपण बाहेर पडणारे लोक आहोत. जिनके इरादे बुलंद होते है वही चट्टा नको भी रहते है, जो तुफानो मे पलते है वही दुनिया बदलते है.
आता डीसीएम आहे म्हणून बोलतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन आमदार, खासदार सगळीकडे मिळतील पण बाळासाहेबांचे शिवसैनिक आहात हे कधी विसरू नका, असे शिंदे म्हणाले. तर आता आपले कोणी गॉडफादर नाही. बाळासाहेबांचे विचार दिघे साहेबांची शिकवण आणि शिवसेना चार अक्षरी मंत्र हे आपले गॉडफादर आहेत, असे म्हणत शिंदेंनी शिवसैनिकांना कानमंत्र दिला आहे.