• Thu. Jan 23rd, 2025
    दूषित पाणी ठरतेय घातक? GBSच्या तीन रुग्णांत आढळला ‘कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी’ जीवाणू, अशी आहेत लक्षणं

    Pune GBS Cases: जीबीएस हा आजार होण्यापूर्वी रुग्णांना जुलाब आणि पोटदुखीचा त्रास होत असतानाच आता ‘जीबीएस’च्या तीन रुग्णांमध्ये ‘कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी’ हा जीवाणू आढळून आला आहे.

    महाराष्ट्र टाइम्स
    water tap AI

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : जीबीएस हा आजार होण्यापूर्वी रुग्णांना जुलाब आणि पोटदुखीचा त्रास होत असतानाच आता ‘जीबीएस’च्या तीन रुग्णांमध्ये ‘कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी’ हा जीवाणू आढळून आला आहे. कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी जीवाणू दूषित पाणी आणि अन्नाद्वारे शरीरात जातो. त्यामुळे दूषित पाणी आणि अन्नामुळेच ‘जीबीएस’चे रुग्ण वाढले का, याचा ताताडीने शोध घेणे आवश्यक असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले.

    हा कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी या जीवाणूमुळे ‘जीबीएस’चा होण्याचा धोका असतो. हा जीवाणू दूषित पाणी, अन्न आणि प्राण्यांच्या माध्यमातून शरीरात जातो, याला ‘न्यूरॉलॉजिकल सोसायटी ऑफ पुणे’ या संघटनेनेदेखील दुजोरा दिला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने बुधवारी पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्याचा आढावा घेतला. यातही पाण्याची आणि अन्नाची तापसणी करण्यात यावी; तसेच पाण्याचे स्रोत आणि पाण्याच्या टँकरची तपासणी करावी, अशा सूचना सर्व तज्ज्ञांनी मांडल्या. त्यानुसार तातडीने पाण्याचे सर्वेक्षण करावे, रुग्ण आढळून येणाऱ्या परिसरातील हॉटेल, अन्नपदार्थांची दुकानांची तपासणी करावी अशा सूचना राज्याच्या आरोग्य विभागाने पुणे महापालिकेला दिल्या.
    Bacchu Kadu: शरद पवार, उद्धव ठाकरे लवकरच भाजपसोबत जातील; बच्चू कडूंचा गौप्यस्फोट
    सिंहगड रस्ता, किरकटवाडी, धायरी या भागांतील रुग्ण जास्त असल्याने या ठिकाणी डायरिया किंवा पोटदुखीच्या रुग्णांची संख्या जास्त असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे घरोघरी जाऊन सर्वेक्षण सुरू करण्यात आल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. ‘कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी’ हा जीवाणू आढळून आलेले तिन्ही रुग्ण सिंहगड रस्ता या परिसरातील असून, या रुग्णांवर पूना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या तिन्ही रुग्णांना अर्धांगवायू झाला आहे. पीसीआर तपासणीतून या रुग्णांना ‘कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी’चा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.
    मुंबईत आज शक्तिप्रदर्शन; बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त ठाकरेंचा अंधेरीत, शिंदेंचा बीकेसीत मेळावा
    ‘तपासणीत जीवाणूच्या संर्सगाचे निदान’
    ‘दाखल असलेल्या सहापैकी तीन रुग्णांची ‘पीसीआर टेस्ट’ करण्यात आली. तपासणीत या तिन्ही रुग्णांना कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी या जीवाणूचा संसर्ग झाल्याचे निदान झाले. अजून एका रुग्णाची पीसीआर तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या रुग्णांना सुरुवातीला जुलाबाचा त्रास झाला होता. त्यानंतर काही दिवसांनी ‘जीबीएस’ची लक्षणे दिसून आली,’ असे ज्येष्ठ न्यूरोलॉजिस्ट डॉ. सुधीर कोठारी यांनी सांगितले.
    रेल्वेतून उजवीकडे उतरलेले चिरडले गेले…; कुटुंबातील सदस्य गमावलेल्या तरुणाने सांगितला मृत्यूचा थरार
    जीबीएस हा दुर्मीळ हा दुमीळ आजार असून, यातून बरे होण्यासाठी वेळ लागतो. मात्र, या आजारावर उपचार उपलब्ध आहेत. सुरुवातीला या आजारात जुलाबाची लक्षणे दिसून आली आहेत. त्यामुळे दूषित पाणी आणि अन्नाचे सेवन होणार नाही, याची काळजी घ्यावी. – डॉ. राहुल कुलकर्णी, अध्यक्ष, न्यूरोलॉजिकल सोसायटी ऑफ पुणे

    जुलाब किंवा पोटाचा त्रास झालेल्या प्रत्येक रुग्णाला जीबीएस होत नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये. जीबीएस झालेल्या रुग्णांना बरे होण्यासाठी किमान चार ते पाच आठवडे लागत असल्याचे दिसून येत आहे. – डॉ. आदित्य बारी, फिजिशियन

    कॅम्पिलोबॅक्टर संसर्गाची लक्षणे अतिसार, पोटदुखी, ताप, मळमळ अथवा उलट्या

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed