Maharashtra Politics : मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचा इशारा, शिवसेना नेते राहुल शेवाळे यांनी दिला होता. मात्र तूर्तास तांत्रिक अडचणींमुळे शिवसेना ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत असल्याची माहिती आहे.
आज मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचा इशारा, शिवसेना नेते राहुल शेवाळे यांनी दिला होता. मात्र तूर्तास तांत्रिक अडचणींमुळे शिवसेना ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत असल्याची माहिती आहे.
पक्षप्रवेश लांबणीवर का?
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित शिवसेनेच्या मेळाव्यात ठाकरे गटाच्या खासदारांचा पक्षप्रवेश अपेक्षित होता. परंतु तांत्रिक अडचणींमुळे तो लांबणीवर पडल्याचे म्हटले जाते. ठाकरे गटाचे सध्या नऊ खासदार आहेत. पक्षांतरबंदी कायद्याच्या कचाट्यातून सुटण्यासाठी किमान दोन तृतीयांश म्हणजेच सहा खासदारांनी पक्ष सोडण्याची गरज आहे. परंतु तशी जुळवाजुळव न जमल्यामुळे फटका बसू शकतो. त्यामुळे मोठ्या नेत्यांचे पक्षप्रवेश रखडल्याची चर्चा आहे. मात्र शिवसेनेच्या बीकेसीमधील मेळाव्यात स्थानिक नेत्यांचे पक्षप्रवेश होणार आहेत.
Lodha Family : लोढा कुटुंबात फूट, दादाने धाकट्या भावाला कोर्टात खेचलं, ५०००००००००० रुपयांची भरपाई मागितली
Uddhav Thackeray : महाराष्ट्रात ‘ऑपरेशन धनुष्यबाण’? अमित शाहांचा दौरा, ठाकरेंचे खासदार शिवबंधन सोडण्याच्या चर्चा
दोन्ही शिवसेनांचे शक्तिप्रदर्शन
विधानसभा निवडणुकीतील जय- पराजय बाजूला ठेवून दोन्ही शिवसेना म्हणजेच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटांनी आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधत दोन्ही पक्ष आज मुंबईत जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहेत. अंधेरीतील छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे ठाकरे गटाचा, तर वांद्रे-कुर्ला संकुलात शिंदे यांच्या शिवसेनेचा मेळावा होत आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे रणशिंग फुंकले जाणार आहे.
Ajit Pawar : सैफवर हल्ला की अभिनय? नितेश राणेंना संशय; अजितदादा म्हणाले, राणेंच्या मनात शंका असेल तर त्यांनी…
अलिकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला पराभवाचा जबर धक्का बसला. विधानसभेतील निराशाजनक कामगिरीनंतर ठाकरे गटात प्रचंड नाराजी पसरल्याचे बोलले जाते. अनेक माजी आमदार आणि निवडणुकीतील पराभूत उमेदवार ठाकरे गटाची साथ सोडण्याच्या मनःस्थितीत असल्याचीही चर्चा आहे. अशातच पक्षाने विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी दावा न केल्याने पक्षातील काही आमदारही नाराज आहेत. याशिवाय विधानसभेतील दारुण पराभवानंतर महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची मागणीही शिवसैनिकांकडून केली जात आहे.