Walmik Karad Judicial custody News : संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. कराडने पूर्वी सरेंडर केले होते. खंडणीच्या प्रकरणातही न्यायालयीन कोठडी आहे. सीआयडीने काही मुद्दे स्पष्ट केल्यानंतर पूर्ण न्यायालयीन कोठडी दिली आहे.
प्रत्येक कायद्यामध्ये किती दिवस पोलीस कोठडी असते ठरलेलं असतं. सीआयडीकडून वाल्मिक कराड याचा तपास पूर्ण झाल्याचं न्यायालयाला सांगितल्यावर न्यायालयीन कोठडी दिली जाते. हा तपास तूर्त प्राथमिक स्वरूपातील तपास पूर्ण झाला आहे. वाल्मिक कराड याच्यावर दोन वेगवेगळे गुन्हे आहेत. यामध्ये खंडणीच्या प्रकरणामध्ये कराडला न्यायालयीन कोठडी आहे. आता संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये कराडला न्यायालयीन कोठडी सुनावली गेली आहे.
न्यायलयीन कोठडी मिळाल्यानवर आरोपीली जामीनासाठी अर्ज केला जातो. त्यामुळे कराडकडून जामीनासाठी अर्ज केला जाऊ शकतो. मात्र मकोकाचा लागला असल्याने त्याला जामीन मिळणं कठीण आहे. मागील सुनावणीवेळी कराडने कोठडी मागितली होती. देशमुखांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. त्यामुळे आता कराडलाही न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आज पार पडलेल्या सुनावणीवेळी सीआयडीकडून आणखी वाढीव कोठडीची मागणी करण्यात आली नाही. वाल्मिक कराड याचा बुधवारी एक व्हिडीओ समोर आला होता. ज्यामध्ये वाल्मिक कराड हा खंडणी मागितली त्या दिवशी विष्णू चाटे याच्या ऑफिसमध्ये जता आहे. यावेळी कराडसोबत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, प्रतिक घुले दिसत आहे. त्यासोबतच पोलीस निरीक्षक राजेश पाटीलसुद्धा उपस्थित होते.
दरम्यान, वाल्मिक कराड याला न्यायालयीन कोठडी कशी मिळाली? न्यायलयाच्या या निर्णयामुळे असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे.