Bhiwandi Crime News : आरोपी मोहम्मद नसीम कादीर शेख याच्यासह मन्नु अन्सारी, नसीम शेख यातिघांनी मिळून अल्ताफ याला १९ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास, भिवंडी शहरातील उमर मस्जीदजवळ असलेल्या साहील हॉटेल समोरील रस्त्यावर गाठत, त्याच्याशी वाद घातला. मात्र यावेळी हा वाद एवढा विकोपाला गेला कि तिघांनी मिळून त्याला भर रस्त्यावत बेदम मारहाण केली. व त्याच्या पोटात धारदार चाकू भोसकला.
याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात भा.न्या.संहीता कलम १०९, ११५(२), ३(५), सह म.पो. कायदा कलम ३७(१) १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करत मुख्य आरोपीसह तिघा मित्रांना पोलिसांना बेड्या ठोकल्या आहेत. मोहम्मद नसीम कादीर शेख ( वय २५ भिवंडी), मन्नु अन्सारी नसीम शेख असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर अल्ताफ अन्सारी (वय २५) असे गंभीर जखमी मित्राचं नाव आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्य आरोपी मोहम्मद नसीम कादीर शेख याचा ‘ए के दाऊद’ या नावाने व्हॉट्सॲप ग्रुप आहे. या ग्रुपमध्ये त्याचे सर्व मित्र लूम कामगार असून बिहार राज्यातील मधुनबी जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यामध्ये जखमी अल्ताफ हाही ग्रुपमध्ये असल्याने व्हाटसअप ग्रुपवर सर्वानी एकच स्टेट्स ठेवण्यास ग्रुप एडमिन, मुख्य आरोपी नसीम याने सांगितले. मात्र आपल्या मोबाईलमधील व्हॉट्सॲपवर स्टेट्स ठेवण्यास अल्ताफने नकार देऊन विरोध केला. याच कारणावरून अल्ताफ व आरोपीमध्ये भांडणही झाले होते.
दरम्यान, मुख्य आरोपी मोहम्मद नसीम कादीर शेख याच्यासह मन्नु अन्सारी, नसीम शेख यातिघांनी मिळून अल्ताफ याला १९ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास, भिवंडी शहरातील उमर मस्जीदजवळ असलेल्या साहील हॉटेल समोरील रस्त्यावर गाठत, त्याच्याशी वाद घातला. मात्र यावेळी हा वाद एवढा विकोपाला गेला कि तिघांनी मिळून त्याला भर रस्त्यावत बेदम मारहाण केली. व त्याच्या पोटात धारदार चाकू भोसकला. खळबळजनक बाब म्हणजे त्याच्या पोटात चाकू भोसकल्यानंतर हल्लेखोर मित्र त्याला उचलून उपचारासाठी घेऊन जात असतानाच, त्या ठिकाणी क्राईम पीआय बळीराम सिंग परदेशी यांनी तत्काळ चाकू हातात असलेल्या मुख्य आरोपीला पकडले. तर दोघे हल्लेखोर फरार झाले होते. दुसरीकडे घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने भिवंडी शहारत एकच खळबळ उडाली होती.