• Wed. Jan 22nd, 2025
    ‘विष्णू चाटे बीड ऐवजी लातूर जेलमध्ये का? तुरुंगात सुभेदार मुंडे दिमतीला,’ दमानियांनी ‘स्पेशल ट्रीटमेंट’वर बोट ठेवले

    Anjali Damania Claim : संतोष देशमुख हत्या प्रकरणी अंजली दमानियांनी आक्रमक होत अनेक धक्कादायक दावे केले आहेत. आता देखील याप्रकरणी त्यांनी मोठा दावा केला आहे. संतोष देशमुखांचा मारेकरी विष्णु चाटे याला पोलीस प्रशासनाकडून स्पेशल ट्रीटमेंट मिळत असल्याचा त्यांनी दावा केलाय.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : संतोष देशमुख हत्या प्रकरणी अंजली दमानियांनी सुरुवातीपासून आक्रमक होत अनेक धक्कादायक दावे केले आहेत. आता देखील याप्रकरणी त्यांनी मोठा दावा केला आहे. संतोष देशमुखांचा मारेकरी विष्णु चाटे याला पोलीस प्रशासनाकडून स्पेशल ट्रीटमेंट मिळत असल्याचा त्यांनी दावा केलाय. विष्णू चाटे सारख्या गुन्हेगाराला जेलचा चॉइस का? विष्णु चाटेने बीड ऐवजी लातुर कारागृहाची मागणी का केली? असे सवाल उपस्थित करत त्यांनी ट्विटच्या माध्यातून विष्णु चाटेबाबत खुलासा देखील केला आहे.

    अंजली दमानियांनी आपल्या एक्स हँडलवर पोस्ट लिहून विष्णु चाटेसाठी जेलमध्ये मर्जीतील पोलीस ठेवण्यात आल्याचे नमूद केले आहे. त्या लिहितात की, विष्णु चाटेने बीड येवजी लातुर कारागृहाची मागणी का केली आणि ती त्यांची मागणी पूर्ण करण्यात आली? असा प्रश्न टाकत त्यांनी पुढे ३ जणांचे नावही घेतले आहेत. ते म्हणजे, पहिला सुभेदार, नारायण मुंडे (जवळचे नातेवाईक) दुसरा मुरलीधर गित्ते (बंदुक वाल्या फडचा मेव्हणा) तिसरा श्रीकृष्ण चौरे (मावसभाऊ व ५ पोकलेनचा मालक). हे सर्व मर्जीतले अधिकारी का? असे विचारत त्यांनी पोलीस प्रशासनाला घेरले आहे.

    यासोबतच ‘हा आरोप कोणत्याही समजाविरुद्ध नसल्याचे’ दमानिया म्हणाल्या आहेत. तर असे जेल आरोपी किंवा गुन्हेगार का मागतो यासाठी दिलेले कारण समजून घ्यावे, असेही त्यांनी सांगितले.
    चेतना कळसे जळाली की जाळली? वडिलांचा गळफास, आई वेडी झाली, भाऊ गायब; धसांचे आकांवर गंभीर आरोप
    तर दमानियांनी पुढे असाही दावा केला की, त्याच्या स्पेशल ट्रीटमेंटची सुरुवात कारागृहातील आगमनापासुनच आहे. ताबडतोब ही पूर्ण चौकशी मुंबईला हलवा आणि त्या गुन्हेगाराला पण मुंबईला आर्थर रोड जेलमध्ये ठेवा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. तर आपण ADG संजय सक्सेना यांना भेटून ही मागणी केल्याचेही नमूद केले आणि उद्या DG रश्मी शुक्ला यांची सकाळी भेट घेणार असल्यातेही त्यांनी सांगितले.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    केईएम रुग्णालय मुंबईकरांचे आधारवड; रुग्णांना जागा कमी पडू नये यासाठी केईएममध्ये आयुष्मान शताब्दी टॉवर उभे करावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे – महासंवाद
    महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचा मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त ग्रंथचर्चा व भातखंडे संगीत परंपरा सादरीकरण – महासंवाद
    संत्रावर्गीय फळ पिकाच्या फळगळतीमुळे झालेल्या नुकसानीस विशेष बाब म्हणून १६५ कोटी ८३ लाखाची मदत देण्यास राज्य शासनाची मंजुरी – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील – महासंवाद

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed