• Tue. Jan 21st, 2025
    मराठीत बोलणार नाही, दहिसरमध्ये बाऊन्सर्सची मुजोरी, मनसेने वठणीवर आणलं, मराठीत माफी मागितली

    MNS on Marathi vs Hindi : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हिंदी भाषिकांचा समाचार घेत दोघा बाऊन्सरना मराठीत माफी मागायला लावल्याचं समोर आलं आहे.

    Lipi

    मुंबई : दहिसर मीरा रोड भागातील हॉटेलच्या बाऊन्सरनी मराठी भाषेत बोलण्यास नकार दिल्यामुळे हिंदी-मराठी वाद पुन्हा उफाळून आला. मराठीत बोलण्यास नकार दिल्यानंतर दोघा बाऊन्सरसोबत झालेल्या संभाषणाचा व्हिडिओ एका तरुणाने सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हिंदी भाषिकांचा समाचार घेतला. या प्रकरणी दोघा बाऊन्सरना मनसेने मराठीत माफी मागायला लावल्याचं समोर आलं आहे.

    व्हिडिओमधील संभाषण काय?

    बाऊन्सर १ : बिनधास्त व्हिडिओ बना लो, एकदम बिनधास्त
    मराठी भाषिक तरुण : मी तर मराठीतच बोलणार, महाराष्ट्रात राहतो आपण, मराठी येत नाही का?
    बाऊन्सर २ : बीस साल से रह रहे है हम… २००५ से रह रहे है
    मराठी भाषिक तरुण : मी तर तुला प्रेमाने बोलतोय, मातृभाषेत बोल तू, कुठून आलास तू?
    बाऊन्सर १ : मैने आपको गाली देके बात किया क्या? आपने क्या बोलाने प्रेमाने बात कर.. तो मैने क्या गाली दिया क्या?
    मराठी भाषिक तरुण : गाली देके बात करने का सवाल नही है. तू इकडे काम करतोयस ना, मला हिंदी नीट बोलता येत नाही, मला माझी मातृभाषा येते.

    मुंब्य्रात तरुणाला घेराव

    याआधी, मुंब्रा, कल्याण, गिरगाव भागातही मराठी विरुद्ध हिंदी भाषिक वाद उफाळून आला होता. फळ विक्रेत्याला मराठी का येत नाही विचारले, म्हणून जमावाने तरुणाला कान पकडून माफी मागायला लावल्याचे मुंब्य्रात समोर आले होते. मराठी तरुण मुंब्य्रातील एका विक्रेत्याकडून फळं विकत घेत असताना वाद झाला होता. त्यानंतर मराठी तरुणाला मुंब्रा येथील जमावाने शिवीगाळ केल्याचा आरोप झाला होता. मला मराठी येत नाही, मी हिंदीत बोलणार, असं फळ विक्रेता बोलताच मराठी तरुण “महाराष्ट्रात रहायचे असेल, तर मराठी आलेच पाहिजे, मी मुंब्रा बंद करुन टाकेन”असं बोलू लागला होता. यामुळे इतर फळ विक्रेते आणि स्थानिक रहिवाशांनी येऊन मराठी तरुणाला घेरले होते.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्ये नैपुण्य | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 11 वर्षांहून अधिक अनुभव… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed