Akshay Shinde House Seizure Notice : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांच्या घरावर बँकेने जप्तीची नोटीस बजावण्यात आली आहे.
वृत्त असे की, अक्षय शिंदेचे वडील अण्णा शिंदे यांनी जना स्मॉल फायनान्स बँक या खाजगी बँकेकडून अडीच लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र बदलापूर अत्याचार प्रकरणानंतर जनमानसात संतापाची लाट उसळली होती. यामध्ये त्यांच्या घराची तोडफोड करण्यात आली. त्यामुळे ते बदलापूर सोडून ते अज्ञात ठिकाणी वास्तव्यासाठी गेले होते. अशा स्थितीत त्यांच्याकडे कोणताही कामधंदाही नसल्यामुळे त्यांच्या कर्जाचे हप्ते थकले होते. त्यामुळेच आता या बँकेने त्यांच्या घरावर थेट जप्तीची नोटीस आणली आहे.
वृत्तानुसार, ४ डिसेंबर २०२४ रोजी ही नोटीस लावण्यात आली असून नोटीस लावल्यापासून ६० दिवसात थकीत २ लाख १६ हजार रुपये रकमेचा भरणा करावा. अन्यथा घर ताब्यात घेऊन जप्त केले जाणार, अशी नोटीस बजावण्यात आली आहे.