शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचं दोन दिवसीय अधिवेशन पार पडलं.यावेळी धनंजय मुंडे यांनी आक्रमक भाषण केलं.बीडच्या पालकमंत्री पदी निवड झाल्याबद्दल अजित पवारांचं मुंडेंनी स्वागत केलं.आमचा जिल्हा बिहार आणि आमची परळी तालिबान नाही असं मुंडे म्हणाले.संतोष देशमुख प्रकरणावरून होणाऱ्या आरोपांवरही धनंजय मुंडे यांनी भाष्य केलं.