• Sun. Jan 19th, 2025
    सावकाराच्या जाचामुळे आधी पोटच्या ९ वर्षीय मुलाला संपवले, नंतर आई-वडिलांनी उचलले टोकाचे पाऊल; वडिलांचे प्राण वाचले पण…

    Edited byविमल पाटील | Authored by प्रशांत श्रीमंदिलकर | Lipi | Updated: 18 Jan 2025, 11:50 pm

    Pune Pimpri Chinchwad News : पिंपरी चिंचवड शहरातून खाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून एका ९ वर्षीय मुलाची गळा दाबून हत्या करत, स्वतः आई वडिलांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली.

    Lipi

    प्रशांत श्रीमंदिलकर, पुणे : पिंपरी चिंचवड शहरातील चिखली परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. खाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून एका ९ वर्षीय मुलाची गळा दाबून हत्या करत, स्वतः आई वडिलांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली. या दुर्दैवी घटनेत आईचा मृत्यू झाला आहे तर वडील गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने पिंपरी-चिंचवड शहरात एकच खळबळ उडाली आहे.

    धनराज वैभव हांडे (वय ९) असे चिमुरड्याचे नाव आहे. तर आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असलेल्या ३६ वर्षीय शुभांगी वैभव हांडे यांचा मृत्यू झाला आहे. तर वडील वैभव हांडे हे यात गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच चिखली पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत वडिलांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे.

    वृत्तानुसार, वैभव हांडे यांनी एका खाजगी सावकाराकडून अंदाजे ४ ते ८ लाख रुपये १० टक्के व्याजाने घेतले होते. त्याची परतफेड करण्यासाठी सावकार शिवीगाळ व मारहाण करत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. हांडे यांच्या तक्रारीवरुन चिखली पोलिसांनी आरोपी सावकार संतोष कदम, एक महिला आरोपी, संतोष पवार, जावेद खान यांच्यावर गुन्हा दाखल केला असून त्यांना बेड्या देखील ठोकल्या आहेत.

    धक्कादायक म्हणजे ज्यावेळी ९ वर्षीय धनराजने सुद्धा आत्महत्या केली, असे गृहीत धरण्यात येत असताना त्याच्या शवविच्छेदन अहवालातून मात्र ती हत्या असल्याचे समोर आले. गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे निदर्शनात आले आहे. त्यामुळे पोलिसांनी वडिलांवर देखील गुन्हा दाखल केला आहे. तर याप्रकरणी चिखली पोलीस पुढील तपास करत आहेत.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed