• Sat. Jan 18th, 2025

    राज्याच्या राजकारणात आठ दिवसात भूकंप; ठाकरे गटातून खूप मोठा पक्षप्रवेश…उदय सामंत यांचं विधान

    राज्याच्या राजकारणात आठ दिवसात भूकंप; ठाकरे गटातून खूप मोठा पक्षप्रवेश…उदय सामंत यांचं विधान

    Uday Samant on UBT : उद्योग मंत्री उदय सामंत यांनी उबाठा गटावर मोठं वक्तव्य केलं आहे. लवकरच ठाकरे गटातील मोठा पक्षप्रवेश एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली होईल असं ते म्हणाले.

    Lipi

    प्रसाद रानडे, रत्नागिरी : सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी पाहायला मिळत आहेत. शरद पवार – अजित पवार हे एकत्र येथील अशा चर्चा सुरू असून महाविकास आघाडीमध्ये खदखद पाहायला मिळत आहे. आता अशातच शिवसेनेचे नेते उद्योग मंत्री उदय सामंत यांनी राज्याच्या राजकारणात आठ दिवसात मोठा भूकंप होण्याचे संकेत दिले आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबद्दल मोठं खळबळजनक विधान त्यांनी केलं आहे.

    शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा खऱ्या अर्थाने आम्ही जपत आहोत आणि आम्ही तीन वर्षांपूर्वी केलेला उठाव हा बरोबर होता हेच आता स्पष्ट झालं आहे. असं सांगत येत्या काही दिवसांत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा खूप मोठा पक्षप्रवेश आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली होईल, असं मोठं विधान उदय सामंत यांनी केलं आहे. भास्कर जाधव यांच्यासारख्या मोठ्या नेत्याचं मार्गदर्शन जर का आम्हाला सगळ्यांना मिळालं तर ते आमच्यासाठी फायदेशीर आहे असं सूचक विधान सामंत यांनी केलं आहे.
    Santosh Deshmukh Murder Case : बीड प्रकरणात उज्वल निकम यांच्या नियुक्तीचा प्रयत्न, पण काही लोकांकडून… मुख्यमंत्र्यांची टीका
    स्वतः मुख्यमंत्री १८ तारखेला डावोस दौऱ्यावर जात आहेत, मी १९ तारखेला जातोय, मी २४ तारखेला परत येईन, तोपर्यंत वाट बघावी. जनतेला अपेक्षित असलेला फार मोठा पक्षप्रवेश पुढच्या आठ दिवसांमध्ये होणार आहे, असाही मोठा दावा सामंत यांनी केल्याने राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप होण्याचे संकेत आहेत.
    खांद्याला खांदा लावून मी कुठेही उपस्थित असतो, पहाटेचा शपथविधी आठवा; माणिकराव कोकाटेंमुळे भर सभागृहात हशा पिकला
    भास्कर जाधव यांना ठाकरे गटातून शिवसेनेत आणण्याचा प्रस्ताव दिला गेला आहे का? असं विचारता सामंत म्हणाले म्हणाले, की प्रस्ताव दिला गेला आहे किंवा नाही याबद्दल मला काही माहिती नाही, पण ते ज्येष्ठ आहेत. गेले पंचवीस-तीस वर्षे ते राजकारणात आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात आमदार असलेले भास्कर जाधव यांच्यासारखा ज्येष्ठ, अनुभवी नेत्याचे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जर का आम्हाला मार्गदर्शन मिळालं तर ते आमच्यासाठी मौलिक आहे असं सूचक विधान शिवसेनेचे नेते उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी येथे माध्यमांशी बोलताना केलं आहे.

    राज्याच्या राजकारणात आठ दिवसात भूकंप; ठाकरे गटातून खूप मोठा पक्षप्रवेश…उदय सामंत यांचं मोठं विधान

    भास्कर जाधव यांची व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप बद्दल ते म्हणाले, की शिवसेनेची तीन वर्षांपूर्वीच काँग्रेस झाली होती. त्यामुळेच आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली उठाव केला. त्यामुळे खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचा वारसा आम्ही जपतोय, शिवसेनेचं धनुष्यबाण आहे. आता भास्कर जाधव यांची जी कुचंबना आता होत आहे तीच कुचंबना आमची तीन वर्षांपूर्वी होत होती आणि म्हणून आम्ही तीन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली उठाव केला होता हा पुनरुच्चार सामंत यांनी केला.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed