• Sat. Jan 18th, 2025
    चिमुकल्याला जबड्यात धरून बिबट्या ज्वारीच्या रानात, पठ्यानं ट्रॅक्टर थेट शेतात घातलं; अन्…

    Chhatrapati Sambhajinagar News: महेश सिद्धार्थ आखाडे वय९ वर्ष मोर्चा राहणार बडवाणी मध्य प्रदेश असे बिबट्याच्या हल्ल्यात मरण पावलेल्या चिमुकल्याच नाव आहे. याप्रकरणी स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसा वैजापूर तालुक्यातील वीटखेडा परिसरात गट क्रमांक 133 येथे पूरक काशिनाथ चव्हाण यांच्या शेतात मध्य प्रदेश येथील काही मजूर कामानिमित्त कुटुंबासह आले होते.

    हायलाइट्स:

    • चिमुकल्याला जबड्यात धरून बिबट्या ज्वारीच्या शेतात
    • पठ्यानं ट्रॅक्टर थेट शेतात घातलं; अन्…
    • छत्रपती संभाजीनगर येथील धक्कादायक घटना

    Lipi
    मुलाला बिबट्याने फरफटत नेलं

    सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : मध्य प्रदेशातून मजुरीसाठी आलेलं कुटुंब शेतात कापूस वेचताना झाडाखाली खेळणाऱ्या चिमुकल्या बालकावर बिबट्याने झडप घातली. १५० फूट ज्वारीच्या शेतात फरफटत नेले. मोठ्या भावाने आरडाओरड केली. ट्रॅक्टर चालकाने मुलाला नेलेल्या शेतात ट्रॅक्टर घातल्याने घाबरून बिबट्या पसार झाला. मात्र तोपर्यंत मुलाचा मृत्यू झाला होता. ही थरारक घटना वैजापूर तालुक्यातील प्रवचखेडा परिसरात घडली.महेश सिद्धार्थ आखाडे (वय ९, रा. बडवाणी, मध्य प्रदेश) असं बिबट्याच्या हल्ल्यात मरण पावलेल्या चिमुकल्याचं नाव आहे. या प्रकरणी स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार वैजापूर तालुक्यातील प्रवचखेडा परिसरात गट क्रमांक १३३ येथे पूरक काशिनाथ चव्हाण यांच्या शेतात मध्य प्रदेश येथील काही मजूर कामानिमित्त कुटुंबासह आले होते. कुटुंब परिसरात कापूस वेचत असताना चिमुकला झाडाखाली खेळत होता. एकटा चिमुकल्याला बघून बिबट्याने त्याच्यावर झडप घातली. चिमुकल्याला जबड्यात पकडत बिबट्या तब्बल १५० फूट ज्वारीच्या शेतात घुसला. बिबट्याने चिमुकल्याला जबड्यात धरलेला थरारक दृश्य मोठ्या भावाने बघताच तो ओरडला. यावेळी शेजारी ट्रॅक्टर चालवणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने मुलाला नेलेल्या शेतात थेट ट्रॅक्टर घातले. ट्रॅक्टरच्या आवाजाने बिबट्याने मुलाला सोडून पळ काढला. बिबट्याच्या या हल्ल्यात चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
    Saif Ali Khan Attack : सैफकडील महिला मदतनीसानेच हल्लेखोराला घरात घेतलं? पोलिसांना संशय, दया नायक अ‍ॅक्शन मोडमध्ये

    घटनेची माहिती मिळताच वन विभाग व शिवर पोलिस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी प्रवचखेडा येथील गट क्रमांक १३३ मध्ये दाखल झाले. मुलाला फरफटत नेताना शेतात अक्षरशः रक्त सांडलं होतं. चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली. या घटनेमुळे गावकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली. १८ दिवसात परिसरात बिबट्याने हा दुसरा हल्ला केला आहे. बिबट्याचा वावर वाढल्याने ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed