Saif Ali Khan Attack News : , एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की, एवढ्या मोठ्या इमारतीतील कोणाच्या घरी कोणी आले की आधी मालकाला फोन केला किंवा मेसेज केला जातो. मंजुरी मिळाल्यानंतरच त्या व्यक्तीला घरात प्रवेश दिला जातो. अशा स्थितीत सैफला घरात प्रवेशाची परवानगी कोणी दिली किंवा सर्वांना चकमा देऊन घरात प्रवेश कसा केला? ह्या प्रश्नाची उकल पोलिस करत आहेत.
सैफ अली खानच्या घराच्या इमारतीखाली ३ सुरक्षारक्षक तैनात होते. सैफवरील हल्ल्यानंतर त्यांची चौकशी केली असता, एका गार्डने “माझी सकाळची शिफ्ट होती आणि त्यावेळी मी झोपलो होतो”, असे वक्तव्य केले. नाईट शिफ्ट कर्मचाऱ्यांची तपासणी करा. सैफ-करीनाच्या इमारतीखाली दोन शिफ्टमध्ये गार्ड ड्युटी करतात. एकावेळी ३ ते ४ रक्षक हजर असतात. पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाला, त्यामुळे रात्रपाळीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पोलिसांनी सैफच्या कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले
पोलिसांनी सैफ अली खानच्या इमारतीतील रक्षक आणि कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. पोलिस सर्वांची कसून चौकशी करत आहेत. मिळालेल्या माहितीवरुन, जेव्हा अज्ञात व्यक्ती सैफच्या घरात घुसला तेव्हा त्याला सैफच्या मोलकरणीने पकडले. त्यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाला. हा आवाज सैफच्या कानापर्यंत पोहोचताच तो लगेच तीथे पोहोचला. एक अज्ञात व्यक्ती त्याच्या मोलकरणीशी वाद घालत असल्याचे सैफने त्यावेळी पाहिले.
अज्ञात व्यक्ती घरात कशी घुसली?
सैफ अली खानने सुरुवातीला त्या व्यक्तीशी शांतपणे बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र तेवढ्यात त्याने सैफवर चाकूने हल्ला केला. त्याच्यावर अनेक वार केल्यानंतर चोरटा तेथून पळून गेला. मात्र, एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की, एवढ्या मोठ्या इमारतीतील कोणाच्या घरी कोणी आले की आधी मालकाला फोन केला किंवा मेसेज केला जातो. मंजुरी मिळाल्यानंतरच त्या व्यक्तीला घरात प्रवेश दिला जातो. अशा स्थितीत सैफला घरात प्रवेशाची परवानगी कोणी दिली किंवा सर्वांना चकमा देऊन घरात प्रवेश कसा केला? ह्या प्रश्नाची उकल पोलिस करत आहेत.