वाल्मिक कराडवर मकोका दाखल करण्यात आल्यानंतर सुरेश धसांचं विधान चर्चेत आलंय. वाल्मिक कराडसह माझे चांगले संबंध होते, अशी कबुली सुरेश धसांनी दिली आहे. मात्र आता कराड माणसं मारायला लागला आहे, अशी टीकाही त्यांनी केली. मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना सुरेश धसांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.