• Wed. Jan 15th, 2025

    ‘शिवसेनेची जवळ जवळ काँग्रेस झालीय’; ठाकरेंच्या जवळच्या शिलेदाराच्या वक्तव्याने खळबळ

    ‘शिवसेनेची जवळ जवळ काँग्रेस झालीय’; ठाकरेंच्या जवळच्या शिलेदाराच्या वक्तव्याने खळबळ

    चिपळूणमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बैठकीत आमदार भास्कर जाधव यांनी शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी पदाधिकाऱ्यांचे खडेबोल काढत जुन्या शिवसैनिकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. त्यांच्या वक्तव्यामुळे पक्षात खळबळ उडाली असून उद्धव ठाकरे यांची भूमिका पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    प्रसाद रानडे, रत्नागिरी : शिवसेनेची जवळ जवळ काँग्रेस झालीय जुने जाणते शिवसैनिक तळमळतायत सांगतात पाय आपटत आहेत. पण त्यांचा ऐकणारा कोणी नाही, अशी खदखद चिपळूण येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बैठकीत ठाकरे गटाचे नेते विद्यमान आमदार भास्कर जाधव यांनी बोलून दाखवल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत भास्कर जाधव यांचे खडेबोल सुनावले आहेत. या बैठकीतील भास्कर जाधव यांच्या या कथेत संभाषणाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या बैठकीत शिवसेनेचे नेते सचिव माजी खासदार विनायक राऊत जिल्हाप्रमुख आण माजी आमदार संजय कदम यांनाही त्यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीबद्दल सूचना आणि सल्ला दिला आहे.

    जे पदाधिकारी काम करत नाहीत त्यांना बाजूला करायची आमच्यात हिंमत नाही…काम न करणाऱ्याला तो नाराज होऊ नये म्हणून दुसरं पद दिलं जात असं सांगत जिल्हाप्रमुख संजय कदम तुम्ही एकदा या सगळ्याचा आढावा घ्या, असेही निर्देश भास्कर जाधव यांनी या बैठकीत दिले. या बैठकीला खासदार विनायक राऊत जिल्हाप्रमुख आणि माजी आमदार संजय कदम आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. निवडणूक काळात पक्षाच्या शाखा प्रमुखा पासून सर्वांच्या नावाने वगमान काढावे लागतात. निवडणूक काळातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर भास्कर जाधव यांची तीव्र नाराजी. कोणत्या पदाधिकारी वसुली करतो कोण काय करतो या बद्दलही भास्कर जाधव यांनी खडे बोल सुनावले आहेत.

    बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा जुन्या शिवसैनिकांच्या सूचना ऐकल्या जात नाहीत – आमदार भास्कर जाधव

    चिपळूण मधील पदाधिकारी बैठकीत भास्कर जाधवांनी काढली मनातली सल. सचिव विनायक राऊत यांच्यासह जिल्हा प्रमुख संजय कदम यांचीही बैठकीला हजर होते. त्यामुळे भास्कर जाधव यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांना खडे बोल सुनावल्याने आता या सगळ्या वरती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोणती भूमिका म्हणतात हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं ठरणार आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed