सिंधुदुर्ग विमानतळावरून शिवसेना ठाकरे गट व भाजपात जुंपली आहे. विमानतळावरून नारायण राणेंनी वैभव नाईक यांना आव्हान दिलं होतं. विमानतळाला टाळं मारलं तर तुझ्या घराला टाळं मारेन असं राणे म्हणाले होते. यावर आता वैभव नाईक यांनीही नारायण राणेंना प्रत्युत्तर दिले आहे. मी अशा धमक्यांना भीक घालत नाही, असा पलटवार नाईकांनी केला आहे.