शिवसेना ठाकरे गट आणि भाजपच्या युतीवरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. यावरून गुलाबराव पाटलांनी भाजपला संदेश देत आपलं मत व्यक्त केलंय. भाजपच्या पडत्या काळात आम्ही उठाव केला अशी जाणीव पाटलांनी करून दिली. तर यावेळी पाटलांनी उद्धव ठाकरे व संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकावरून देखील त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय.