• Sun. Jan 12th, 2025
    पन्नाशीच्या ‘वानखेडे’च्या मातीशी जुळली नाळ; खेळपट्टीची मशागत करणाऱ्या ‘ग्राऊंड्समन’ने जागवल्या आठवणी

    Wankhede Stadium Mumbai: या स्टेडियमचा सुवर्णमहोत्सवी सोहळा लवकरच सुरू होईल. त्या निमित्ताने सुमारे ४० वर्षे या स्टेडियमची खेळपट्टी राखण्याचे काम करणारे ‘ग्राऊंड्समन’ (माळी) विजय मोहिते यांनी मैदानासह खेळाडूंबाबतच्या अनेक आठवणींना उजळा दिला.

    महाराष्ट्र टाइम्स
    wankhede stadium

    मुंबई: आता चकचकीत स्पोर्ट्स क्लब, आंतरराष्ट्रीय दर्जाची क्रीडासंकुले होत असली, तरी ऐतिहासिक जेतेपदांचे साक्षीदार असलेल्या वानखेडे स्टेडियमला क्रिकेटप्रेमींच्या मनात मानाचे स्थान आहे. धावांचा डोंगर, फटकेबाजी अन् चेंडूची जादू अनुभवलेल्या या स्टेडियमने पाहता पाहता अर्धशतकी खेळी केली आहे. या स्टेडियमचा सुवर्णमहोत्सवी सोहळा लवकरच सुरू होईल. त्या निमित्ताने सुमारे ४० वर्षे या स्टेडियमची खेळपट्टी राखण्याचे काम करणारे ‘ग्राऊंड्समन’ (माळी) विजय मोहिते यांनी मैदानासह खेळाडूंबाबतच्या अनेक आठवणींना उजळा दिला.

    मुंबई क्रिकेट संघटनेच्या या वानखेडे स्टेडियमवर खेळपट्टी आणि मैदान करण्याचे काम जवळपास वर्षभर सुरू असते. रोज मैदानाला पाणी देणे, गवताची छाटणी करणे, जंगली गवत छाटणे, सामन्याच्या तारखेनुसार पाणी देणे, अशी कामे अत्यंत कुशलतेने सुरू असतात. हे काम करणाऱ्यांमध्ये विजय मोहिते हे सर्वांत अनुभवी. ‘बारक्या’ म्हणूनच त्यांची ओळख आहे. सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, रवी शास्त्री, सचिन तेंडुलकर, अजिंक्य रहाणे यांसारख्या अनेक क्रिकेटपटूंशी त्यांचे चांगले संबंध आहेत. या क्रिकेटपटूंचे ते आवडतेच आहेत. ड्रेसिंग रूममध्ये ते असतील, तर चिंता नाही, ही खेळाडूंची भावना त्यांच्या कामाची पावती देते.
    Sanjay Raut: ‘मविआ’ही विसर्जनाकडे; शिवसेना ठाकरे गट महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार, राऊत यांची घोषणा
    मोहिते आपले मेहुणे मुकुंद पवार यांच्यामुळे येथे माळीकाम करू लागले. ते मूळचे कोकणातील. त्यांची गावाकडे शेती आहे. तिथे मातीत काम करण्याची सवय होती. ही मातीची ओढ त्यांना मुंबईत खूप काही देऊन गेली. स्टेडियममधील काम त्यांनी लीलया सुरूकेले. ‘प्रत्येकाला कोणते काम कसे करायचे हे माहिती आहे. सामना सुरू असताना सूचनांकडे आमचे लक्ष असते. प्रकाशझोतात सामने असले की, आम्ही मैदानाबाहेर जाऊन आकाशात बघत असतो. मोबाइलवरून पावसाचा अंदाज घेत असतो. त्यामुळे तयारीनिशी सज्ज असतो,’ असे ते सांगतात..‘एकापेक्षा जास्त दिवसांचा सामना म्हणजे जास्त पूर्वतयारी असते. त्याहीपेक्षा सामन्याच्या आदल्या दिवशीही काम असते. रोज सकाळी साडेसहा वाजता यायचे, खेळपट्टीवरील आच्छादन काढायचे, खेळपट्टीचे नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यायची. खेळ संपल्यावर मैदान कुठे खराब झाले असेल, तर त्याची डागडुजी करायची. ही कामे पूर्ण करण्यात किमान संध्याकाळचे साडेसहा तरी वाजतात. उशिरा घरी जाऊन परत सकाळी लवकर यावे लागते,’ असा दिनक्रम मोहिते यांनी सांगितला.
    इंदूरहून पळालेले भिकारी नागपुरात? अचानक वाढली संख्या, उपराजधानीत १६०० निराश्रित
    पूर्वी अन् आता मोहिते यांनी पूर्वीचा काळ जागवला ‘पूर्वी गवत छाटणीचे आव्हान असायचे. • एका बोटाच्या पेराएवढे आम्ही तेव्हा गवत ठेवत असू. कोणते गवत छाटायचे • आणि कोणते पूर्ण काढायचे ते आम्हाला पाते बघून कळते. काही गवत लगेच वाढत असे, त्यामुळे पूर्ण छाटणीला तीन-चार दिवस लागत. आता मशिनने एका दिवसात काम होते, मात्र सामनेही खूप होतात. सुरुवातीस आम्हाला कमी पगार होता. आता तो वाढला आहे,’ असे मोहिते यांनी नम्रपणे सांगितले.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed