Vasai Crime News: मयंक ज्वेलर्स हे ज्वेलर्स दुकान वसई पश्चिमेकडील अग्रवाल सिटी परिसरात असून रतनलाल संघवी हे दुकानाचे मालक आहेत. शुक्रवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास रतनलाल संघवी दुकान बंद करण्याच्या तयारीत होते. त्यामुळे ते आपल्या ज्वेलर्स दुकानातील दागिन्यांचे ट्रे कपाटात ठेवत होते. याचदरम्यान हेल्मेट घातलेला व मास्क लावलेला असे दोन दरोडेखोर अचानक त्यांच्या ज्वेलर्स दुकानात शिरले.
हायलाइट्स:
- वसई येथे ज्वेलर्स दुकानावर दारोडा
- घटना सीसीटीव्ही कॅमऱ्यात कैद
- ४० लाख रुपये किमतीचे सोने लंपास
विष्णू चाटेचा मोबाईल सापडेना, कोर्टाचा मोठा सवाल, काय घडले न्यायालयात?
दरोडेखोरांनी ज्वेलर्स दुकानात सशस्त्र दरोडा टाकून दुकानातील 40 लाख रुपये किमतीचे 50 तोळे सोन्याचे दागिने चोरी केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरोडाच्या या घटनेमुळे परिसरातील इतर ज्वेलर्स मालक, दुकानदार यांच्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर माणिकपूर पोलीस ठाण्याततील पोलीस अधिकारी कर्मचारी, दाखल झाले. त्याचप्रमाणे पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन पौर्णिमा चौगुले- श्रुंगी यांनी देखील घटनास्थळाला भेट देत पाहणी केली. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून. याप्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके स्थापन करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.