• Sat. Jan 11th, 2025
    संतोष देशमुख हत्येसंदर्भातील आरोपांचं उत्तर महाराष्ट्राला कधी मिळणार? सुप्रिया सुळेंनी नाव न घेता मुंडेंना घेरले

    Supriya Sule on Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलीस सहकार्य करत नसल्याचा देशमुख कुटुंबीयांचा आरोप आहे. यावर बोलताना खासदार सुप्रिया सुळेंनी सरकारला धारेवर धरले आहे तर धनंजय मुंडेंनाही नाव न घेता सवाल केला आहे.

    Lipi

    दीपक पडकर, बारामती : संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलीस सहकार्य करत नसल्याचा देशमुख कुटुंबीयांचा आरोप आहे. यावर बोलताना खासदार सुप्रिया सुळेंनी सरकारला धारेवर धरले आहे तर नाव न घेता धनंजय मुंडेंनाही सवाल केला आहे. ‘विरोधक म्हणून विषय नाही, हा माणुसकीचा विषय आहे. बीड आणि परभणी दोन्ही घटनेत कोणीही राजकारण आणू नये. राज्यात प्रचंड अस्वस्थता आहे. ज्या पद्धतीने दोन्ही हत्या झाल्या याचे उत्तर द्यावं लागेल. फायनान्शिअल फ्रॉड किती आहे. सुरेश धस, बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागर, सोळंकी, दमानिया या सर्वांकडून जी माहिती येत आहे त्याचं उत्तर महाराष्ट्राला कधी मिळणार? असा सवाल सुप्रिया सुळेंनी केला.

    धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावर सुप्रिया सुळेंना प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या, तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे. तुम्ही बघताय सुरेश धस असतील, बजरंग सोनवणे असतील, सोळंकी, संदीप क्षीरसागर, अंजली दमानिया या सर्वांचीच मागणी आहे. मला वैयक्तिक काही बोलायचं नाही पण काही नैतिकता राहिली आहे की नाही? या महाराष्ट्रात आणि राजकारणात.’ नैतिकतेने या सरकारने राजीनाम्याचा निर्णय घ्यावा. माझी सातत्याने हीच मागणी असल्याचे सुळेंनी अधोरेखित केले आहे.
    संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मकोका; ‘त्या’ केसमुळे वाल्मिक कराडला दिलासा
    राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली चालवल्या जाणाऱ्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याकडून गाळप होणाऱ्या उसाला प्रति टनास पहिली उचल २ हजार ८०० अशी जाहीर करण्यात आली आहे. मात्र यावरून ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी कारखान्याला भेट दिली आहे. यावेळी सुप्रिया सुळेंनी प्रशासन आणि शेतकऱ्यांसोबत चर्चा केली आहे. बैठकीदरम्यान कारखान्याचे अध्यक्ष आणि संचालक मंडळ उपस्थित नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

    खासदार सुप्रिया सुळे यांनी पुढे साखर निर्यातीवरुन राज्यसरकारसह केंद्रावर निशाणा साधला आहे. ‘एमएसपीचा खूप मोठा मुद्दा आहे. तसेच साखर निर्यात व्हावी, ही गेल्या अनेक दिवसांची मागणी आहे.’ यासोबतच शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून कांदा निर्यात करू नका, अशी मागणी करत आहे तरी देखील कांदा निर्यात होतो. साखर कारखानदार आणि शेतकरी म्हणतात साखर निर्यात करायला परवानगी द्या. पण त्यांना मिळत नाही, हे सरकार मोठं गमतीशीर आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. जो मागत नाही त्याला मिळतंय आणि जो मागतोय त्याला मिळत नाही, त्यामुळे हे सर्व गंमतीशीर आहे, असेही सुळे यांनी नमूद केले.

    संतोष देशमुखांचा ज्या पद्धतीने खून झाला आहे त्यांच्या मुलीचे अश्रू अनावर होत आहेत. तीस दिवस झाले बीड आणि परभणीच्या दोन्ही कुटुंबाला न्याय मिळालेला नाही. शेतकऱ्यांच्या बाबतीत एवढं मोठं मतदान करून या महाराष्ट्रातील जनतेने या सरकारला निवडून दिलं आहे ज्यांनी त्यांना त्या जागेवर बसवलं आहे, त्या मायबाप जनतेला न्याय मिळावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed