• Fri. Jan 10th, 2025
    कधी शिंदे नाराज, तर कधी दादा! काय काय सुरु होतं? फडणवीस मिश्किल बोलले, कोणाले चिमटे काढले?

    विधानसभा निवडणुकीत भाजपला नेत्रदीपक यश मिळालं. पण सरकार स्थापन होण्यास दोन आठवडे लागले. चर्चा, बैठकांचं गुऱ्हाळ सुरु होतं. त्यावेळी काळजीवाहू मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे अचानक त्यांच्या गावाला निघून गेले.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    नागपूर: विधानसभा निवडणुकीत भाजपला नेत्रदीपक यश मिळालं. पण सरकार स्थापन होण्यास दोन आठवडे लागले. चर्चा, बैठकांचं गुऱ्हाळ सुरु होतं. त्यावेळी काळजीवाहू मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे अचानक त्यांच्या गावाला निघून गेले. त्यामुळे त्यांच्या नाराजीच्या चर्चा रंगल्या. मराठा मुख्यमंत्री असावा, महायुतीचं नेतृत्त्व शिंदेंनी केल्यानं तेच मुख्यमंत्री व्हावेत, एकनाथ है तो सेफ है, अशी विधानं शिवसेनेच्या नेत्यांकडून केली जात असल्यानं नाराजीच्या चर्चांना बळ मिळालं. या सगळ्या चर्चा सुरु असताना बैठकांमध्ये नेमकं काय घडत होतं, त्याचा उलगडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. ते नागपुरात जिव्हाळा पुरस्कार सोहळ्यात एका मुलाखतीत बोलत होते.

    ‘आपणच पुन्हा मुख्यमंत्री होऊ असं एकनाथ शिंदेंना वाटत होतं. ते साहजिकदेखील होतं. पण मतदारांनी जनादेशच असा दिला की आमचा मुख्यमंत्री न करणं हे जनतेला रुचलं नसतं. कार्यकर्त्यांना ते पटलं नसतं. त्यामुळे आमच्या पक्षातील वरिष्ठांनी एकनाथ शिंदेंशी चर्चा केली. या कालावधीत माध्यमांमध्ये बरंच काही काही सुरु होतं. पण भाजपच मोठा पक्ष आहे. त्यामुळे तुमचाच मुख्यमंत्री झाला पाहिजे. त्याला माझी काही हरकत नाही, असं शिंदेंनी एका मिनिटात सांगितलं होतं,’ असं फडणवीसांनी सांगितलं.
    …अन् शिंदे DCM व्हायला राजी झाले! भाईंना कसं समजावलं? देवाभाऊंनी सगळं विस्कटून सांगितलं
    सत्ता स्थापनेच्या घडामोडी सुरु असताना, बैठकांनी जोर धरलेला असताना माध्यमांमध्ये दिसत असलेल्या बातम्यांचा उल्लेखही फडणवीसांनी केला. यावेळी त्यांनी माध्यमांना चिमटे काढले. ‘सगळ्या चर्चा करुन सरकार स्थापन करु असं आमचं ठरलं होतं. त्याला थोडा कालावधी लागला. त्या कालावधीत कधी शिंदे साहेब नाराज, तर कधी अजित दादा नाराज, अशा बातम्या माध्यमांनी दाखवल्या. अर्थात त्यांनाही दोष देता येत नाही. त्यांना २४ तास चॅनेल चालवायचंय. त्यांना बातमी मिळाली तर ठीक, नाही तर त्यांना बातमी बनवावी पण लागते. पण एक गोष्ट नक्की सांगतो, शिंदे साहेबांनी फार अटी, शर्ती घातल्या, आढेवेढे घेतले असं काही झालं नाही. त्यांनी तात्काळ उपमुख्यमंत्रिपद स्वीकारलं होतं,’ असं फडणवीस म्हणाले.
    भाजपच्या २ मंत्र्यांमध्ये स्पर्धा लागली, पक्षाची डोकेदुखी वाढली; पुण्यात नेमकं चाललंय काय?
    २०२२ मध्ये शिंदे मुख्यमंत्री झाले. त्याची घोषणा फडणवीसांनी केली होती. आपण सरकारमध्ये असणार नाही, असं त्यांनी आधी सांगितलं होतं. पण अवघ्या काही मिनिटांत ते उपमुख्यमंत्री होण्यास तयार झाले. त्यावेळी पडद्यामागे घडलेल्या घडामोडीही फडणवीसांनी सांगितल्या. ‘शिंदेंना मुख्यमंत्री करु. मी त्या सरकार बाहेर राहीन, अशी विनंती मी वरिष्ठांना केली होती. कारण लोक काय विचार करतील याची भीती मला होती. लोकांना वाटेल, हा माणूस सत्तेचा किती भुकेला आहे, किती सत्तापिपासू आहे. आधी मुख्यमंत्री होता. आता पुन्हा सत्ता हवी तर परत मंत्रिमंडळात चालला, अशी टीका मला आवडणार नाही. म्हणून मी म्हटलं मला पक्षाचं काम द्या, मी पक्ष वाढवतो,’ अशा शब्दांत फडणवीसांनी अडीच वर्षांपूर्वी सत्तांतर होताना झालेल्या घडामोडी सांगितल्या.
    उद्या काय होईल ते आज सांगता येत नाही! बाळासाहेबांवरील ‘त्या’ प्रश्नाला ठाकरेंचं सूचक उत्तर
    ‘मी सरकारबाहेर राहणार हे आधी ठरलं होतं. पण मग पक्षानं निर्णय बदलला. मला सरकारमध्ये जाण्यास सांगितलं गेलं. पण आता वाटतं, वरिष्ठांचा तो निर्णय योग्य होता. त्यांनी सांगितलं, नवीन सरकार चालवायचंय, युती सरकार चालवायचंय. त्यात सगळ्यात मोठा पक्ष आपण आहोत. पण आपला मुख्यमंत्री नाही. तेव्हा अनुभवी माणसानं आत असलं पाहिजे. पंतप्रधान मोदींनी मला सांगितलं, बाहेर राहून सरकार चालू शकत नाही. पण लोक काय म्हणतील असा विचार मनात सतत सुरु होता. पण पक्षानं सांगितलेली मी जबाबदारी घेतली. त्यानंतर अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी यांचे संदेश आले. मुख्यमंत्री झाल्यावर जितका मानसन्मान मिळाला नसता तितका उपमुख्यमंत्री झाल्यावर मला मिळाला. त्याचा आनंद आणि समाधान आहे,’ असं फडणवीस म्हणाले.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed