मस्साजोगच्या सरपंच हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होतेय. अशातच त्यांच्या विरोधात करुणा शर्मा यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. करुणा शर्मांनी न्यायालयात याचिका दाखल केल्याने मुंडेंच्या अडचणी वाढल्या आहेत. याचिकेत मुंडेंनी भ्रष्ट मार्गाने निवडणूक जिंकल्याचा व इतर आरोप करण्यात आलेत. याचिकेचा निकाल शर्मांच्या बाजूने लागल्यास मुंडेंचा पाय खोलात जाण्याची शक्यता आहे.