• Wed. Jan 8th, 2025

    राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना लोकायुक्तांकडून कामकाजासंबंधीचा अहवाल सादर – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jan 6, 2025
    राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना लोकायुक्तांकडून कामकाजासंबंधीचा अहवाल सादर – महासंवाद




    मुंबई, दि. ०६ : राज्याचे लोक आयुक्त न्या. वि. मु. कानडे (नि.) व उप लोक आयुक्त संजय भाटिया यांनी सोमवारी (दि. 6) राज्यपाल सी. पी.  राधाकृष्णन यांची राजभवन, मुंबई येथे भेट घेऊन त्यांना आपल्या कामकाजासंबंधीचा 51 वा वार्षिक एकत्रित अहवाल  सादर केला.

    लोकायुक्त कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार २०२3 या अहवालाधीन वर्षात लोकायुक्त कार्यालयाकडे 4 हजार 790 नवीन तक्रारी नोंदविण्यात आल्या. वर्षाच्या सुरुवातीला 4 हजार 583 प्रकरणे प्रलंबित होती. अशा प्रकारे सन २०२3 मध्ये 9 हजार 373 प्रकरणे कार्यवाहीकरिता उपलब्ध झाली.

    नोंदणी केलेली 4 हजार 555 प्रकरणे अहवालाधीन वर्षात निकाली काढण्यात आली आणि सन २०२3 च्या वर्षअखेरीस 4 हजार 818 प्रकरणे प्रलंबित राहिली, असे लोकायुक्त कार्यालयाकडून यावेळी कळविण्यात आले.

    महाराष्ट्रातील लोक आयुक्त संस्थेने गेल्या पाच दशकांमध्ये अनेक तक्रारदारांची गाऱ्हाणी दूर केली असून गेल्या काही वर्षात ७५ टक्के पेक्षा जास्त तक्रारींमधील तक्रारदारांच्या गाऱ्हाण्यांचे निवारण करण्यात आले असल्याचे नमूद करण्यात आले.

    ०००







    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed