चाकण येथे महात्मा फुले आणि सावित्री बाई फुले यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं.या कार्यक्रमाला शरद पवार आणि छगन भुजबळ एकाच मंचावर दिसले.दरम्यान कार्यक्रम पत्रिकेवर शरद पवारांनी काहीतरी लिहिलं आणि भुजबळांना वाचायला दिलं.शरद पवार यांनी काय लिहिलं होतं? असा प्रश्न छगन भुजबळ यांना पत्रकारांनी विचारला. त्यावर गाणं गात भुजबळांनी उत्तर देणं टाळलं.