लाडकी बहीण योजनेवरून महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर योजना बंद होणार असे महिलांना वाटू लागलेय. त्यातच विरोधक देखील यावरून महायुती सरकारवर टीका करत आहेत. यावर अजित पवार यांनी स्पष्टीकरण देत महिलांना विश्वास दिला आहे. लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असा शब्द अजित पवारांनी दिला.