Devgad Kesar Mangoes: यावर्षी हापूस आंब्याला मागे टाकत कोकणातूनच देवगडमधून केसर आंब्याची पहिली पेटी आज, सोमवारी वाशीतील फळबाजारात दाखल होत आहे.
फळांचा राजा असलेला हापूस आंबा बाजारातही राजा आहे. त्यामुळे या फळाचे स्वागतही राजासारखेच होत असते. हापूस आंब्याची, हंगामातील पहिली पेटी बाजारात आली की, तिची विधिवत पूजा करून व्यापारी आंब्याच्या हंगामाला सुरुवात करतात. मात्र, यावर्षी हापूसला मागे टाकत देवगडमधील वाघोटनमधून केसर आंब्याची पहिली पेटी वाशीच्या घाऊक फळबाजारात दाखल होत आहे. देवगड तालुक्यातील वाघोटनमधील शेतकरी शकील मुल्ला यांनी आपल्या शेतात केसर आंब्याची बाग फुलवली आहे. त्यांनी आपल्या बागेतून आंबा हंगामातील केशर आंब्याची पहिली पाच डझनाची आंब्याची पेटी रविवारी रवाना केली आहे. सोमवारी सकाळी ही पेटी बाजारात एन. डी. पानसरे अँड सन्स यांच्याकडे दाखल होणार आहे. त्यानंतर या आंब्याच्या पेटीची विधिवत पूजा केली जाणार आहे.
Nashik: ‘सिव्हिल’मधील बाळ चोरीचा १२ तासांत उलगडा, एमबीए महिलेचं कृत्य, कारण धक्कादायक
हापूसचा हंगाम उशिराने
हापूस आंब्याचा हंगाम यावर्षी थोड्या उशिराने सुरू होणार आहे. अधीमधी पडलेला पाऊस, तसेच त्यांनतर आलेली थंडी आणि पुन्हा जाणवणारा उकाडा यामुळे कोकणातील हापूस आंब्याला उशिराने मोहोर आलेला आहे. त्यामुळे हापूस आंब्याची आवक फेब्रुवारीमध्ये उशिराने होईल. तसेच सुरुवातीला कमी प्रमाणात आवक होईल, तर एप्रिलमध्ये यावर्षी जास्त प्रमाणत हापूस आंबा बाजारात येईल, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.