Produced byविश्रांती शिंदे | Contributed byसंजय आहेर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम4 Jan 2025, 8:40 pm
काँग्रेसच्या कैलास गोरंट्याल यांचा यावेळी शिवसेना शिंदे गटाचे अर्जुन खोतकर यांनी पराभव केला. हा पराभव गोरंट्याल यांच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचं दिसतंय. त्यानंतर आता गोरंट्याल यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचे संकेत दिले.ते म्हणाले, येणाऱ्या काही दिवसांमध्ये जालन्यामध्ये नक्कीच राजकीय भूकंप होणार आहेत. जर पक्षाने ठरवले तर महाविकास आघाडीच्या नेतृत्व खालीच महानगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूक लढवल्या जातील.माझ्यासोबत काही ‘अस्तिनचे साप खूप’ होते, त्यांना पहिले बाहेर काढणे गरजेचे आहे.जे दहा-पंधरा वर्षांपासून माझ्या सोबत होते, त्यांनीच मला धोका दिला आहे. मला अनेक पक्षाकडून ऑफर येत आहेत, मात्र मी अजून निर्णय घेतला नाही. मला जे ७३ हजार मतं पडली ती काँग्रेस पक्षाची नाहीत तर मी केलेल्या कामाची आहेत.