• Thu. Jan 9th, 2025
    तुम्हाला सांगेन का? तुमच्यासमोर रोज ओरडत बसू का? ‘तो’ प्रश्न ऐकताच भुजबळ चिडले, एकदम संतापले

    Chhagan Bhujbal: राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. यामध्ये काही अनुभवी नेत्यांचा पत्तादेखील कट झाला. ज्या नेत्यांचा पत्ता कट झाला त्यामध्ये प्रमुख नाव होतं ते राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचं.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    पुणे: राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. यामध्ये काही अनुभवी नेत्यांचा पत्तादेखील कट झाला. ज्या नेत्यांचा पत्ता कट झाला त्यामध्ये प्रमुख नाव होतं ते राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचं. मंत्रिमंडळात समावेश न झाल्यामुळे छगन भुजबळ हे कमालीचे नाराज झाले आहेत. आपली नाराजी छगन भुजबळ यांनी वेळोवेळी बोलून दाखवली आहे. इतकंच नाही तर कार्यकर्त्यांसोबत चर्चा केल्यानंतर पुढील निर्णय घेणार असल्याची घोषणादेखील भुजबळ यांनी केली आहे.

    गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ परदेश दौऱ्यावर होते. ते भारतात परतल्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली आहे. मी माझा निर्णय घेतल्याचं भुजबळ म्हणाले आहेत. इतकंच नाही तर नाराजीबद्दल प्रश्न विचारताच भुजबळांचा पारा चांगलाच चढल्याचं पाहायला मिळालं. नाराजीवर प्रश्न विचारताच भुजबळ म्हणाले, मी जर काही निर्णय घेतला तर तो तुम्हाला सांगेन का? अन् मी नाराज आहे तर तुमच्यासमोर रोज नाराजी नाराजी ओरडत बसू का?’, तर परवा रात्री मी आलो तेव्हापासून सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्या कार्यक्रमात व्यस्त आहे. मला अजिबात घाई नाही. जे निर्णय घ्यायचे आहेत ते मी घेतले आहेत. योग्य वेळेला ते मी जाहीर करेन, असं भुजबळ म्हणाले.

    ‘अशा राक्षसांना फाशी शिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही’
    ज्या पद्धतीनं बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली.,ते ऐकल्यानंतरदेखील अंगावर काटा येतो. एखाद्याला गोळी मारून ठार करतात हे आपण समजू शकतो. पण अंगावर २०० फटके मारणं. अजून न सांगण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. या अशा राक्षसांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही, असं म्हणत छगन भुजबळ यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येवरून संताप व्यक्त केला आहे. याच प्रकरणी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. याबाबत भुजबळांना विचारलं असता त्यांनी यावर फार बोलणं टाळलं. मला काही कल्पना नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काय करायचे ते पाहतील असं भुजबळ म्हणाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed