Authored byमानसी देवकर | Contributed byसंजय आहेर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम1 Jan 2025, 9:15 pm
आमदार अर्जुन खोतकरांच्या वाढदिवसानिमित्त समारंभ आयोजित करण्यात आलेला. यावेळी घनसावंगीचे आमदार हिकमत उढाण यांनी अर्जुन खोतकरांची स्तुती केली. त्याचबरोबर खोतकरांसोबतचे कॉलेजमधील गंमतीदार किस्से देखील उढाणांनी सांगितले. महायुतीचे ५ आमदार येऊनही जालन्याला मंत्रिपद न मिळाल्याचे दुर्दैव त्यांनी सांगितले. यंदाही जालन्याला बाहेरून पालकमंत्री येणार अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली.