• Fri. Jan 10th, 2025
    एक कोटी ४७ लाख रुपयांच्या हिऱ्यांची चोरी, १२० सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी…

    Authored byआशिष मोरे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 1 Jan 2025, 4:07 pm

    Mumbai Crime : गोरेगाव पोलिसांनी १ कोटी ४७ लाख रुपयांचे हिरे चोरून राजस्थानमधून पळून गेलेल्या कारागिराला अटक केली आहे. या चोरीतील अटक करण्यात आलेला आरोपी गोरेगाव येथील जवाहर नगर येथे असलेल्या हिऱ्याच्या कारखान्यात हिरे कापण्याचे काम करत असे. पोलिसांनी आरोपीकडून १ कोटी ४१ लाख रुपये किमतीचे चोरीचे हिरे जप्त केले आहेत.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : गोरेगाव पोलिसांनी १ कोटी ४७ लाख रुपयांचे हिरे चोरून राजस्थानमधून पळून गेलेल्या कारागिराला अटक केली आहे. या चोरीतील अटक करण्यात आलेला आरोपी गोरेगाव येथील जवाहर नगर येथे असलेल्या हिऱ्याच्या कारखान्यात हिरे कापण्याचे काम करत असे. पोलिसांनी आरोपीकडून १ कोटी ४१ लाख रुपये किमतीचे चोरीचे हिरे जप्त केले आहेत. सचिन मकवाना असे ४० वर्षीय आरोपीचे नाव असून तो मुळचा गुजरातचा आहे.

    काय आहे प्रकरण?

    दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, ६३ वर्षीय तक्रारदार, हिरे व्यापारी किरण रोकाणी हे कांदिवली येथे राहतात. त्यांचा किरण रतीलाल रोकाणी नावाचा हिरे कापण्याचा कारखाना गोरेगाव येथील जवाहरनगर येथे आहे. गोरेगावमध्ये जेम्स नावाचे दुसरे युनिट किरणचा मुलगा चालवतो, ज्यामध्ये आरोपी सचिन आणि इतर नऊ कारागीर काम करतात. या कंपनीचे व्यवस्थापक महेश काटे आहेत.

    असा लागला आरोपीचा शोध

    महेश स्वतः सर्व कारागिरांना नक्षीकामासाठी हिरे देतो. १० डिसेंबर रोजी त्याने सचिनला १ कोटी ४७ लाख रुपये किमतीचे ४९१ कॅरेटचे हिरेही दिले होते जे आरोपी सचिन घेऊन पळून गेला होता. महेश काटे यांनी किरण रोकाणी यांना या घटनेची माहिती दिली. रोकाणी यांनी गोरेगाव पोलिस ठाण्यात सचिनविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला. अतिरिक्त पोलीस आयुक्त अभिषेक त्रिमुखे आणि पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश उमरे यांच्या पथकाने या घटनेचा तपास केला. १२० सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने गोरेगाव, मालाड, दहिसर, भिलाड, वापी, सुरत, अहमदाबाद, पालनपूर आदी भागात त्याचा शोध घेण्यात आला.

    पोलिसांनी हिरे केले जप्त

    आरोपी वेशभूषा बदलून पोलिसांपासून वाचण्यासाठी गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये इकडे-तिकडे लपत असल्याचे तपासात उघड झाले. राजस्थानच्या सीताफी मधून अखेर सचिनला अटक करण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने हिरे चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीला गेलेला १ कोटी ४७ लाख ७० हजार रुपयांचे ४७० कॅरेटचे हिरे पोलिसांनी जप्त केले आहेत.

    आशिष मोरे

    लेखकाबद्दलआशिष मोरेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि मानसशास्त्र बातम्यांमध्ये आवड. सायकॉलॉजी मध्ये विशेष अध्ययन.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed