Walmik Karad: बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणी केसमधील आरोपी वाल्मिक कराड मंगळवारी पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण आला.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या खंडणी प्रकरणातून करण्यात आली. या खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड आरोपी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या तो अतिशय जवळचा आहे. त्यामुळेच त्याला २२ दिवस अभय देण्यात आलं होतं, असा प्रश्न विचारला जात आहे. विशेष म्हणजे कराडला पोलिसांचं संरक्षण होतं. त्याच्या सुरक्षेसाठी २ पोलीस कर्मचारी त्याच्या सोबत होते. मात्र तरीही तो फरार झाल्यानं पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं.
Walmik Karad: कराड CIDला शरण, जुजबी चौकशी, मग बीडला रवानगी; आज काय काय घडलं? अधिकाऱ्यांकडून सगळे अपडेट्स
आधी पोलीस आणि मग सीआयडीची पथकं मागावर असताना कराड नेमका होता कुठे, हा प्रश्न विचारला जात आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील वातावरण तापलं. ९ डिसेंबरला कराड परळीबाहेर पडला. १० आणि ११ डिसेंबरला तो मध्य प्रदेशातील उज्जैनला गेला होता. तिथून त्यानं चार जणांसोबत एक फोटोही शेअर केला. विशेष म्हणजे त्यातले दोघे पोलीस कर्मचारी होते. त्यांच्यावर कराडच्या संरक्षणाची जबाबदारी होती. तत्पूर्वी बीडमध्ये कराडवर गुन्हा दाखल झालेला होता.
१२ डिसेंबरला भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्त वाल्मिक कराडनं एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. पोलिसांनी यावरुन त्याचं लोकेशन शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ते परळी असं आढळून आलं. १३ डिसेबरला कराड कुठे होता, याचा उलगडा झालेला नाही. १४ डिसेंबरला कराडनं दत्त जयंतीच्या शुभेच्छा देणारी पोस्ट केली. १६ डिसेंबरला त्याचं लोकेशन मध्य प्रदेशातील पेंच अभयारण्यात होतं. त्यानंतर तो गायब झाला. त्यावेळी बीडसह संपूर्ण राज्यात संतोष देशमुख हत्या प्रकरण तापलं होतं.
Walmik Karad Surrender: वाल्मिक कराडचं CID मुख्यालयात आत्मसमर्पण; ज्या कारनं आले, ती कोणाची? मालकाचे डिटेल्स समोर
कराड सीआयडीला शरण आला, त्यावेळी त्याच्यासोबत दोन माजी नगरसेवक होते. पुण्यात चौकशी झाल्यानंतर कराडला बीडमधील केजला नेण्यात आलं आहे. तिथेच त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. केजमधील तालुका न्यायालयात कराडला हजर केलं जाईल. त्यानंतर सीआयडीकडून त्याची कोठडी मागण्यात येईल. कराडच्या कारमधील दोन मोबाईल सीबीआयनं जप्त केले आहेत. त्याचा सीडीआर काढला जात आहे.