Pune Rajgurunagar News: राजगुरूनगर येथे दोन लहान मुलींवर बलात्कार करून हत्या करणारा हॉटेलमधील वेटर अजय दास (५४, रा. पश्चिम बंगाल) याला पोलिसांनी अटक केली आहे.
हायलाइट्स:
- बलात्कार करून दोन अल्पवयीन बहिणींची हत्या
- राजगुरुनगरमधील घटनेनं पुणे हादरलं
- बलात्कार करून दोन अल्पवयीन बहिणींची हत्या
दरम्यान, मृत मुलींच्या नातेवाइकांनी ठिय्या आंदोलन करून हा तपास द्रुतगतीने करून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, समाजाला ‘ॲट्रॉसिटी’ कायद्यान्वये संरक्षण द्यावे आणि आर्थिक मदत करावी, या मागण्यांसाठी गुरुवारी सकाळपासून ठिय्या आंदोलन केले. आरोपीला अटक करेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. सुमारे नऊ तासानंतर सायंकाळी हे आंदोलन मागे घेण्यात आले.
पोलिसाकडून बालिकेशी अश्लील चाळे
विसापूर किल्ल्यावर बंदोबस्तासाठी नेमलेल्या पोलिस शिपायाने दारूच्या नशेत पाच वर्षांच्या बालिकेशी अश्लील चाळे केल्याची संतापजनक घटना बुधवारी दुपारी घडली. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी नराधम पोलिस शिपायाला अटक करून विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सचिन वसंत सस्ते ( ४३, सध्या रा. महंमदवाडी, हडपसर, मूळ रा. जेजुरी) असे पोलिसाचे नाव आहे.
‘नराधमाला कठोर शिक्षा होईल’
कल्याणमधील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार व हत्येचा खटला जलदगती न्यायालयात चालवून नराधमाला फाशीसारखी कठोर शिक्षा होईल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी सांगितले. कल्याण- डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे पीडितेच्या कुटुंबाला भेटून आले, असे नमूद करीत एकनाथ शिंदे यांनी पीडितेच्या कुटुंबीयांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याचे स्पष्ट केले.
