Produced byविश्रांती शिंदे | Contributed byप्रदिप भणगे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम26 Dec 2024, 9:23 pm
कल्याणमधील प्रकरण माणुसकीला काळिमा फासणारे आणि संतापजनक आहे. विकृत लांडग्यांना ठेचून काढण्याची गरज आहे असा संताप आमदार चित्रा वाघ यांनी व्यक्त केला आहे.या बाबत बोलताना वाघ म्हणाल्या, या नराधमाला फाशीच होणार आहे.आम्ही सर्वजण त्या परिवारासोबत आहोत. या कुटुंबाची भेट घेतली. शक्य असतं तर त्या नराधमाचा चौरंगा केला असता. पण ते शक्य नाही. त्यामुळे संविधानाच्या माध्यमातून त्याचा करेक्ट कार्यक्रम करणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवा भाऊ घटनेवर लक्ष ठेऊन आहेत.