Ashok Chavan on Supriya Sule EVM Machine : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी खासदार सुप्रिया सुळेंवर ईव्हीएम मशीनवरुन टीका केली आहे. उशीरा का होईना शहाणपण आलं, असं म्हणत त्यांनी टोला लगावला आहे.
नुकत्याच जाहीर झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीकडून ईव्हीएमवर संशय व्यक्त केला जातं आहे. ईव्हीएमच्या विषयावरून मविआचे नेते संताप व्यक्त करत आहेत. त्यातच गुरुवारी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या यांनी आपले मत व्यक्त करत मी चार वेळा ईव्हीएममुळे निवडून आले आहे. त्यामुळे कसा संशय व्यक्त करू, ईव्हीएम मशीन आणि मतदार यादीतील घोळामुळे संशयास्पद वातावरण निर्माण झालं आहे. या सर्वांचा अभ्यास केला पाहिजे असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीच व्हावी, पहिल्या दिवसापासून…; मला आयुष्यातून उठवायचा डाव, धनंजय मुंडेंचा आरोप
त्यांच्या या वक्तव्याबद्दल अशोक चव्हाण यांना विचारले असता, त्यांनी टोला लगावला. सुप्रिया सुळे यांना उशिरा शहाणपण सुचलं आहे. काही हरकत नाही देर आये दूर आये असं चव्हाण म्हणाले. परभणीचा विषय असो किंवा बीडची घटना असो. यामध्ये चौकशी लागली आहे. जे चौकशी दरम्यान स्पष्ट होईल त्यावर कारवाई होणे अपेक्षित आहे. बेछूट आरोप करू नये, असं आवाहन चव्हाण यांनी केलं.
Manmohan Singh Passed Away : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन, वयाच्या ९२व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मराठा आरक्षणाचा विषय सरकारने गांभीर्याने घेतलाय –
मराठा आरक्षणाचा विषय सरकारने गांभीर्याने घेतलाय, शासन स्तरावर मंत्रिमंडळ उपसमिती आहे, ती आढावा घेत आहे, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी दिली. आता फडणवीस मुख्यमंत्री झालेत आता मज्जा येईल असं वक्तव्य जरांगे पाटील यांनी केलं होतं, त्यावर चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली. नवीन सरकार आलं आहे, पाच वर्ष आहेत. सरकारने हा विषय जोमाने हाती घेतलेला आहे आणि तो मार्गी लागावा असा प्रयत्न आहे, असं चव्हाण म्हणाले.
Ashok Chavan : उशीरा का होईना सुप्रिया सुळे यांना शहाणपण सुचलं, EVM वरुन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा टोला
नांदेडचा पालकमंत्री विकास कामं करणारा असावा
मंत्री मंडळाचा विस्तार झाला आहे. शिवाय खाते वाटप देखील झालं आहे, मात्र पालकमंत्रीवरून महायुतीमध्ये रस्सीखेच पहायला मिळत आहे. नांदेडचा पालकमंत्री कोण होणार यावरून उत्सुकता लागली आहे. नांदेडचा पालकमंत्री विकासाची कामं करणारा असावा आणि नांदेडला जास्तीत जास्त वेळ देणारा पालकमंत्री असावा असं मतं माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे.