• Fri. Dec 27th, 2024
    आमदाराच्या मामीशी अफेअर; १६ वर्षांनी मोठ्या मोहिनी वाघांशी ११ वर्षे संबंध, अक्षय जवळकर कोण?

    Satish Wagh Murder Case: भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे सख्खे मामा सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं आहे. सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघच कटाची मुख्य सूत्रधार असल्याचं पोलीस तपासातून उघडकीस आलं.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    पुणे: भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे सख्खे मामा सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं आहे. सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघच कटाची मुख्य सूत्रधार असल्याचं पोलीस तपासातून उघडकीस आलं. या प्रकरणातील आरोपी अक्षय जवळकर आणि मोहिनी वाघ या दोघांचे अनैतिक संबंध होते. त्यातूनच सतीश वाघ यांची हत्या झाली.

    अक्षय जावळकरचं कुटुंब सतीश वाघ यांच्या मालकीच्या घरात १५ वर्षे भाड्यानं राहत होतं. या कालावधीत अक्षय जवळकर आणि मोहिनी वाघ यांचं सूत जुळलं. मात्र दोघांच्या संबंधात सतीश वाघ अडसर ठरत होते. त्यामुळे त्यांचा काढण्यासाठी मोहिनी वाघनं ५ लाख रुपयांची सुपारी दिली. अक्षय जवळकरनं त्याच्या मित्रांच्या मदतीनं सतीश वाघ यांचं अपहरण करुन धावत्या गाडीत त्यांची चाकूनं वार करुन हत्या केली.
    Satish Wagh Murder: पैशांसाठी हत्या झाल्याचा बनाव, मोहिनी वाघनं अश्रू ढाळले; पण ‘त्या’ टिपनं गुन्ह्याचा उलगडा
    अक्षय जवळकर सध्या ३२ वर्षांचा आहे. त्याचं कुटुंब २००१ पासून सतीश वाघ यांच्या मालकीच्या घरात वास्तव्यास होतं. अक्षय २००१ मध्ये अवघ्या ९ वर्षांचा होता. अक्षयच्या वडिलांचा भेळ, वडापावचा गाडा होता. अक्षय त्यांना व्यवसायात मदत करायचा. वाघ यांचं याच परिसरात ब्लूबेरी नावाचं मोठं हॉटेल आहे. सतीश आणि मोहिनी यांचा मुलगा अक्षयच्या वयाचा आहे. त्यामुळे त्या दोघांची मैत्री झाली. त्यानंतर वाघ यांच्या घरी अक्षयचं येणं-जाणं सुरु झालं.

    २०१३ मध्ये अक्षय २१ वर्षांचा झाला. तेव्हा त्याचे ३७ वर्षांच्या मोहिनी वाघ यांच्यासोबत अनैतिक संबंध निर्माण झाले. दरम्यानच्या काळात अक्षयनं सिव्हिल इंजिनीअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं. २०१६ मध्ये अक्षयचं लग्न करायचं ठरल्यानं त्याच्या आई, वडिलांनी वाघ यांची खोली सोडली आणि ते जवळच असलेल्या दुसऱ्या एका खोलीत भाड्यानं राहायला गेले. अक्षयच्या लग्नानंतरही त्याचे मोहिनी वाघशी असलेले प्रेमसंबंध कायम राहिले. त्याबद्दल वाघ यांना समजताच उभयतांमध्ये वाद सुरु झाले.
    Kalyan Crime: अटक होताच लगेच जामीन; विशाल गवळीच्या चौकशीतून धक्कादायक माहिती उघड; पोलीस यंत्रणा चक्रावली
    यानंतर मोहिनी यांनी सतीश वाघ यांचा काटा काढायचं ठरवलं. सतीश वाघ यांची हत्या केल्यास त्यांचा त्रास संपेल, सगळे आर्थिक व्यवहारदेखील आपल्या हातात येतील असं तिला वाटलं. मग तिनं अक्षयच्या मदतीनं हत्येचा कट रचला. अक्षयनं त्यात स्वत:च्या मित्रांना सहभागी करुन घेतलं. ९ डिसेंबरला सतीश वाघ मॉर्निंग वॉकला गेले. तेव्हा त्यांचं अपहरण करण्यात आलं. धावत्या कारमध्ये त्यांच्यावर ७० वार करण्यात आले. पैशांसाठी वाघ यांची हत्या झाल्याचा बनाव उभा करण्यात आला. पण पोलिसांनी मोहिनी आणि अक्षयची पार्श्वभूमी, दोघांचे सीडीआर तपासले, त्यानंतर गुन्ह्याचा उलगडा झाला.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed