Supriya Sule : ‘मी छगन भुजबळ यांचा संघर्ष जवळून पाहिला आहे. त्यांना जेव्हा तुरुंगात टाकलं तेव्हा त्यांना झालेल्या वेदना मी अनुभवल्या आहेत. त्यांना मंत्रीपद न दिल्याने पक्षाने त्यांच्यावर मोठा अन्याय केला आहे,’ अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.
बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आज पुणे दौऱ्यावर आल्या असत त्यांनी भुजबळांविषयी सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘छगन भुजबळ राज्याचे वरिष्ठ नेते ते कुठल्याही पक्षात असले तरी त्यांचे गेले ४० चे ४५ वर्षाचे योगदान महाराष्ट्र कधी विसरणार नाही. पवार साहेबांच्या अनेक संघर्षात भुजबळ साहेब पवार साहेबांसोबत उभे राहिले आहेत. मी आयुष्यभर विसरणार नाही. त्यांच्यावर यावेळी मोठा अन्याय झाला आहे.’
‘…तर ही जनता तुमचा न्याय करेल, जे तुम्हाला परवडणारे नाही,’ मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांना थेट इशारा
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, मला अजूनही तो दिवस आठवतो त्यांना अटक झाली त्यांच्या वेदना संघर्ष मी जवळून पाहिला आहे, मी अनेकदा जेलमध्ये त्यांना पाहिलं आहे. त्याचं कुटुंब फार दुःखातून गेलं आहे, त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला आहे. भुजबळ साहेब लढवय्या नेते आहेत. वयाने आणि नेतृत्वाने भुजबळ मोठे आहेत.
आमचे भुजबळ साहेबांच्या कुटुंबांसोबत कायम संबंध आहेत. आम्ही कोणासोबत कौटुंबिक संबंध तोडत नाही, संघर्ष काळात मी त्यांचे दुःख जवळून पाहिले आहे, अडचणीच्या काळात त्यांच्या कुटुंबांचे भूगोल आहे ते वेदनादायी आहे. आता त्यांच्या पक्षातील अंतर्गत संबंध असतील बाकी मला माहिती नाही. माझं पोट मोठं आहे सगळ्या पोटातल्या गोष्टी ओठावर आणायच्या नसतात, असेही सुप्रिया सुळेंनी नमूद केले.