Authored byसूरज सकुंडे | Contributed byदीपक जाधव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम25 Dec 2024, 7:44 pm
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांना न्याय मिळण्याबाबत काढण्यात येणाऱ्या मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी गावात सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीला संतोष देशमुख यांच्या पत्नी आणि मुलगी देखील सहभागी झाल्या होत्या. सगळ्यांच्या भाषणानंतर संतोष देशमुख यांच्या मुलीने सगळ्यांशी संवाद साधला.