कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर मकरंद पाटील पहिल्यांदाच साताऱ्यात आले. मंत्री मकरंद पाटील यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. उत्साही कार्यकर्त्यांनी मकरंद पाटलांची चक्क घोड्यावरून मिरवणूक काढली. मकरंद पाटील महायुती सरकारमध्ये मदत व पुनर्वसन मंत्री म्हणून काम पाहतील.